न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (new zealand cricket team) माजी खेळाडू ख्रिस केर्न्स (chris cairns) याला कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. केर्न्सने ५ फेब्रुवारीला स्वतः याविषयीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. केर्न्स मागच्या काही महिन्यांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करत आला होता. अशात ५१ वर्षाच्या या खेळाडूला अजून एका मोठ्या आजाराचा सामना करावा लागणार आहे.
केर्न्सने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट करून चाहत्यांना त्याला कर्करोग झाल्याची माहिती दिली. केर्न्सला कातड्याचा कर्करोग झाला आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “पुढे अजून एक झुंज आहे. पण असे वाटते की, यावेळी पहिल्याच फेरीत प्रकरण संपेल. मला काल सांगितले गेले की, कातड्याचा कर्करोग झाला आहे. हा मोठा झटका आहे आणि नियमित तपासणीनंतर मला हे अपेक्षित नव्हते. मी सर्जन आणि तज्ञांशी दुसऱ्या फेरीतील चर्चा करण्यासाठी तयारी करत आहे. मी जिवंत असण्यासाठी आणि आयुष्यात जे काही केले त्यासाठी किती भाग्यशाली आहे, याचा सतत विचार करत आहे. मी मुलांसोबत खेळात सामील झालो आणि घरी नूहचा वाढदिवसही साजरा केला.”
https://www.instagram.com/p/CZkx9xMvO25/?utm_source=ig_web_copy_link
केर्न्सला मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंत त्याची शस्त्रक्रिया केली गेली. केर्न्सला एक नाही तर ह्रदयाच्या तब्बल चार शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तो काही काही दिवस सिडनीमध्ये दवाखान्यात भरती होता. या दुखण्यातून बरे होताच त्याल अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याच्या कंबरेच्या खालचा भाग निकामी झाला. त्यानंतर तो व्हिलचेअरवर बसून होता. असे असेले तरी कर्न्स या आजारावर मात करत असल्याचे दिसत होते.
दरम्यानच्या काळात तो सोशल मीडियावर देखील सक्रिय होता आणि सतत पुनर्वसनाशी संबंधित पोस्ट शेअर करत होता. डिसेंबर महिन्यात त्याला कुटुंबासोबत नाताळ साजरा करण्यासाठी रुग्णालयातून २ दिवसांची रजाही मिळाली होती. पण आता त्याला कर्करोगाच्या संभीर आजाराचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, कर्न्सने न्यूझीलंड संघासाठी २००६ पासून त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ६२ कसोटी सामने, तर २१५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
हिवाळी ऑलिम्पिकची जोरदार सुरुवात, उद्घाटन सोहळ्यात तिरंगा घेऊन उतरला ‘काश्मिरी बॉय’