आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी (7 फेब्रुवारी) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना यजमान संघाने 281 धावांनी जिंकला. या विजयानंतर न्यूझीलंड संघ डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला मात्र एका-एका स्थानाचे नुकसान झाले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये (NZ vs SA) सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात बुधवारी (7 फेब्रुवारी) न्यूझीलंडने 281 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. न्यूझीलंडने या सामन्यातील पहिल्या डावात 511, तर दुसऱ्या डावात 179 धावा केल्या. विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या डावात 529 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण संघ 80 षटकांमध्ये 247 धावा करून सर्वबाद झाला. तत्पूर्वी आपल्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 162 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने पहिल्या डावात 240 धावांची खेळी केली होती. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) यानेही 118, तर दुसऱ्या डावात 109 धावांची खेळी केली.
उभय संघांतील ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघाने विजय मिळवल्यानंतर डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. डब्ल्यूटीसीच्या चालू हंगामात (2023-25) न्यूझीलंडने तीन कसोटी सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पराभव मिळाला आहे.. 66.66 गुणांसह संघ पहिल्या स्थानावर आहे.
गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ असून त्यांच्याकडे 55.00 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसीच्या चालू हंगामात आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात त्यांना विजय, तर 3 सामन्यात पराभव मिळाला. एक सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघ मायदेसात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिाक खेळत आहे. मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला गेला आणि भारताने 106 धावांनी विजय देखील मिळवला. या विजयानंतर डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. पण बुधवारी न्यूझीलंडच्या यशामुळे भारत तिसऱ्या क्रमांकावर घसरला. हंगामात खेळलेल्या 6 पैकी 3 सामने भारताने जिंकले आहेत, तर दोन सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
यादीत चौथ्या क्रमांकावर बांगलादेश (50.00 गुण), पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान (36.66), सहाव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (33.33), सातव्या क्रमांकावर वेस्ट इंडीज (33.33), आठव्या स्थानी इंग्लंड (25.00) आणि शेवटी नवव्या क्रमांकावर श्रीलंका (0.00) आहे. (New Zealand has reached the number one position in the World Test Championship points table)
महत्वाच्या बातम्या –
…नाहीतर दिल्ली कसोटीत १० विकेट्स कुंबळेसाठी ठरलं असतं स्वप्न
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर