वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41वा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने जिंकली असू गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंड संघात एक बदल झाला आहे. ईश सोधी याच्या जागी लॉकी फर्ग्युसन याची एन्ट्री झाली आहे. तसेच, श्रीलंका संघातही एक बदल झाला आहे. कसून रजीथा याच्या जागी चमिका करुणारत्ने याची एन्ट्री झाली आहे.
स्पर्धेतील कामगिरी
उभय संघांची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर न्यूझीलंड संघ श्रीलंकेच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थिती आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. अशाप्रकारे 8 गुण मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंड चौथ्या स्थानी विराजमान आहे. अशात हा सामना जिंकून न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, श्रीलंका संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 2 सामन्यात विजय, तर उर्वरित 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंका संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे हा त्यांचा औपचारिक सामना आहे. मात्र, हा सामना जर श्रीलंकेने जिंकला, तर न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसेल. (New Zealand have won the toss and have opted to field against Sri Lanka CWC 23)
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 41व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन
श्रीलंका
पथूम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका
हेही वाचा-
न्यूझीलंड कर्णधाराने मॅक्सवेलवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला, ‘त्या डावातील केवळ धावाच नव्हे…’
भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका