---Advertisement---

तिसऱ्या वनडेत नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने, भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल

IND-vs-NZ
---Advertisement---

मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात 1 वाजता नाणेफेक झाली. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले दोन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड संघ तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (New Zealand opt to bowl Against Team India)

तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल झाले आहेत. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर युझवेंद्र चहल आणि उमरान मलिक या दोघांनी शमी- सिराजची जागा घेतली आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंड संघात फक्त एक बदल झाला आहे. हेन्री शिप्लेच्या जागी जेकब डफी याची एन्ट्री झाली आहे.

तिसऱ्या वनडेसाठी उभय संघ
न्यूझीलंड-

फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोलस, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविडकडून रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव, वनडेमध्ये सलामीवीराच्या रूपात गाठला यशाचा मोठा टप्पा
‘मला माहीत नाही, निवडकर्त्यांना विचारा…’, पत्रकाराच्या निर्णयावर भडकला राहुल द्रविड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---