---Advertisement---

व्यस्त वेळापत्रकामुळे किवी गोलंदाजाला आले टेंशन, भारत-पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून घेतली माघार

On: सोमवार, जानेवारी 2, 2023 3:48 PM
Adam Milne
---Advertisement---

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांचा वनडे मालिका खेळणार आहे. याआधीच कसोटी चॅम्पियन संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या एका गोलंदाजाने मालिकेतून माघार घेतली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड पाकिस्ताननंतर भारताविरुद्ध वनडे, टी20 मालिका खेळणार आहे. या सामन्यांमधूनही त्याने माघार घेतली असून त्याने सांगितलेले कारण चकित करणारे आहे.

किवी संघाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने (Adam Milne) याने भारत आणि पाकिस्तान विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांमधून माघार घेतली आहे. तो दुखापतीतून सावरत असून त्याला विदेशी दौऱ्यात लागोपाठ मालिका खेळायच्या आहेत. याच्या तयारीची त्याला चिंता सतावत असून त्याने बोर्डाला विश्रांतीची मागणी केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डनेही त्याला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर बोर्डाने बदली खेळाडूचे नावही जाहीर केले आहे.

बोर्डने पाकिस्तान दौऱ्यासाठी ब्लेयर टिकनर (Blair Tickner) जो कसोटी संघात आहे, त्याची वनडे मालिकेत मिल्नेच्या जागी निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड 16 दिवसांच्या आत 6 वनडे सामने खेळणार आहे. याचेच मिल्नेला टेंशन आले. मागील वर्षी वनडे पदार्पण करणाऱ्या टिकनेर याने 6 वनडे सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.

हा निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यात आला. हा निर्णय कठीण होचा असे निवडकर्ता गेविन लार्सन म्हणाले आहेत. “आगामी दौऱ्यांसाठी वनडे सामन्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ऍडमने त्याची चिंता आमच्यासमोर मांडली. तो लागोपाठ सामने खेळू शकत नाही असे तो म्हणाला यामुळे आम्ही त्याला विश्रांती देण्याचे ठरवले,” असे लार्सन म्हणाले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका 18, 21 आणि 24 जानेवारीमध्ये हैद्राबाद, रायपुर आणि इंदौर येथे खेळले जाणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान वनडे सामने 9, 11 आणि 13 जानेवारीला खेळले जाणार आहेत.

https://twitter.com/ICC/status/1609697430882197510?s=20&t=1rVM5chqGPMdJhCzZGAinA

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ
टॉम लॅथम (कर्णधार), केन विलियम्सन, फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, जॅकॉब डफी, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ब्लेयर टिकनेर, डॅरील मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅंटनर, हेन्री शिप्ले, इश सोधी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर चार वर्षांनंतर विराटच्या ‘त्या’ प्लॅननुसार चालणार टीम इंडिया; आधी दिलेला नकार
श्रीलंकेची डोकेदुखी वाढवणार ‘हे’ दोन गोलंदाज, प्रदर्शनाच्या बाबतीत बुमराह-शमीलाही टाकतील मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---