२००२ ला न्यूझीलंडने केलेला पाकिस्तान दौरा हा केवळ इंजमाम-उल-हकच्या त्रिशतकामुळेच नाही तर कसोटी मालिकेदरम्यान कराचीत झालेल्या बाँबस्पोटामुळेही गाजला होता. त्या दौऱ्यादरम्यानच्या झालेल्या दुर्दैवी घटनांच्या आठवणीबद्दल इंजमामने भाष्य करताना म्हटले आहे की तो दिवस खूप भयानक होता.
इंझमामने त्याच्या युट्यूब व्हिडिओवर बोलताना सांगितले की न्यूझीलंडचे खेळाडू तर घाबरुन स्विमिंग पूलमध्ये रडत होते. तो बाँबब्लास्ट खेळाडूं ज्या हॉटेलमध्ये होते त्याच्या जवळच झाला होता.
इंझमाम म्हणाला, ‘जेव्हा आम्ही कराचीला पोहचलो तेव्हा बाँबब्लास्ट झाला. त्यावेळी लाहोरला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ब्लास्ट झाला होता. पण देवाचे आभार की कोणताही खेळाडूला दुखापत झाली नाही. तो खूप भयानक दिवस होता. ज्या बाजूला बाँबब्लास्ट झाला त्या बाजूलाच माझी रुम होती. माझ्या रुममधील एक आरसा फुटला होता आणि दुसऱ्या बाजूला उडाला होता.’
‘त्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक रुममध्ये असे झाले. मी लगेचच खाली धावलो. मी जेव्हा तिथे पोहचलो, तेव्हा पाहिले न्यूझीलंडचे खेळाडू स्विमिंगपूलमध्ये रडत होते. मी पाहिले की आरसे आणि पडद्यांना काय झाले आहे पण तरीही मी पोलिसांना काय झाले असे विचारले. त्यांनी सांगितले की बाँबब्लास्ट झाला आहे आणि त्यांनी मला खाली जायला सांगितले.’
या ब्लास्टनंतर न्यूझीलंडचे खेळाडू लगेचच मायदेशी परतले. त्यामुळे कराची कसोटी झाली नाही तसेच हा दौराही रद्द करण्यात आला. याबरोबरच या ब्लास्टमुळे पाकिस्तानी खेळाडूंवरही परिणाम झाल्याचे इंझमामने सांगितले.
तो म्हणाला, ‘त्यादिवशी न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला. एवढेच नाही तर आमचे खेळाडूही कमीतकमी एक आठवडा झोपू शकले नव्हते.’
या दौऱ्यातील लाहोरला झालेल्या पहिल्या कसोटीत इंझमाम ३२९ धावांची खेळी केली होती. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी ठरली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
कोहली, सचिन व द्रविड कसोटीत पहिल्यांदा कधी झाले शुन्यावर बाद ? जाणून घ्या…
अख्तरचा ‘वेगाचा बादशाह’ किताब मिळू शकतो बुमराहला, कसा ते घ्या जाणून
जगात एकच मुलाखत घ्यायची ठरलं तर मी ती धोनीची घेईल