सिडनी येथे शनिवारी (१४ नोव्हेंबर) मेलबर्न रेनगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स संघात महिला बिग बॅश लीगमधील ३३ वा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू सोफी डिवाईनने रेनगेड्सविरुद्ध नाबाद ७७ धावांची तडाखेबंद खेळी केली. तिच्या या खेळीने पर्थ स्कॉर्चर्स संघाला ९ विकेट्सने विजय मिळाला. यासह तिने महिला बिग बॅश लीगमध्ये एक मोठा कारनामा केला आहे. डिवाईनने या लीगमध्ये खेळताना षटकारांचा पाऊस पाडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पर्थ स्कॉर्चर्सकडून फलंदाजी करताना डिवाईनने आपल्या खेळीत ३ षटकार ठोकले. त्यामुळे महिला बिग बॅश लीगमध्ये तिने १०० षटकारांचा टप्पा पार केला. असा कारनामा करणारी ती या लीगमधील पहिलीच महिला क्रिकेटपटू बनली आहे.
डिवाईनने महिला बिग बॅश लीगमध्ये आतापर्यंत ७५ सामने खेळले आहेत. त्यात तिने आतापर्यंत तब्बल १०१ षटकार ठोकले आहेत. तिने या लीगमध्ये ३९.९६ च्या सरासरीने २४७८ धावा केल्या आहेत. यातील तिची सर्वोत्तम धावसंख्या ही १०३ धावा आहे.
याव्यतिरिक्त महिला बिग बॅश लीगमध्ये डिवाईनने आतापर्यंत १५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यासोबतच तिने २ शतकेही ठोकली आहेत.
डिवाईननंतर सिडनी सिक्सर्स संघाची अॅशले गार्डनर महिला बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने आतापर्यंत ६३ षटकार ठोकले आहेत. सोबतच सिडनी सिक्सर्सकडून खेळणारी एलिसा हेली ४८ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर