---Advertisement---

जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 9:55 AM
---Advertisement---

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला. यासह एक ऐतिहासिक गोष्टही न्यूझीलंड संघांच्या बाबतीत घडली. न्यूझीलंडने या विजयासह जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हा कारनामा पहिल्यांदाच झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि न्यूझीलंडची आगेकूच 

याआधीच्या मालिकेत न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देत अव्वल स्थानाच्या नजीक पोहोचला होता. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयाने त्यांचे ११७ गुण झाले. ऑस्ट्रेलियाचा मेलबर्नमध्ये भारताविरुद्ध झालेला पराभवही त्यांच्या पथ्यावर पडला. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस जागतिक कसोटी क्रमवारीत पहिले स्थान काबीज करत न्यूझीलंडने आपल्या चाहत्यांना नववर्षाची भेट दिली आहे.

न्यूझीलंड आपल्या संपूर्ण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे समान गुण होते. मात्र न्यूझीलंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियालाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांचे ११६ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे ११५ गुण आहेत. इंग्लंडचा संघ १०६ गुणांसह चौथ्या स्थानी असून श्रीलंकेचा संघ ९१ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

पाकिस्तानला चुरशीच्या लढतीत केले पराभूत 

न्यूझीलंडने बे ओव्हल मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला १०१ धावांनी धूळ चारली. पाकिस्तानी फलंदाजांनी शेवटच्या दिवशी चिवट झुंज देत सामना अनिर्णीत राखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ५ षटके बाकी असताना सर्वबाद झाल्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान ०-१ ने पिछाडीवर पडला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या कर्णधार केन विलियम्सनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

मराठमोळ्या ऋतुराजला मिळाले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या महाराष्ट्र संघात स्थान, तर ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

‘या’ खेळाडूच्या मते उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघच विजयाचा दावेदार

तुझे वजन २०-२५ किलो जास्त आहे म्हणणाऱ्या वेडला रिषभ पंतचे जबरदस्त प्रत्युत्तर, म्हणाला..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---