---Advertisement---

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या कॉनवे, सोधीची शानदार कामगिरी, न्यूझीलंडल मिळवून दिला विजय

---Advertisement---

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सोमवारपासून(२२ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिलाच सामना न्यूझीलंडने आपल्या नावावर करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात ५३ धावांनी विजय मिळवला. या विजयात डेवॉन कॉनवे आणि इश सोधीने मोलाचा वाटा उचलला.

न्यूझीलंडने या सामन्यात दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १७.१ षटकातच १३१ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून केवळ मिशेल मार्श आणि ऍश्टन एगारलाच २० धावांचा टप्पा ओलांडता आला. मिशेल मार्शने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर एगारने २३ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडकडून इश सोधीने ४ षटकात २८ धावा देत सर्वाधिक ४ विकेटस घेतल्या. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर काईल जेमिसनने मार्शची महत्त्वाची १ विकेट घेतली. साऊथीने ऍरॉन फिंच(१) आणि ग्लेन मॅक्सवेलला(१) बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्याला बोल्टने चांगली साथ देत मॅथ्यू वेड(१२) आणि जोश फिलिपला (२) बाद केले. पुढे सोधीने ४ विकेट्स घेत न्यूझीलंडचे काम आणखी सोपे केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात खास झाली नव्हती. त्यांनी डॅनियल सॅम्सने मार्टिन गप्टील(०) आणि केन विलियम्सन(१२) यांना स्वस्तात बाद केले. तर झाय रिचर्डसनने टीम सिफर्टला(१) बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची आवस्था ४ षटकात ३ बाद १९ धावा अशी झाली होती.

पण यानंतर कॉनवेने ग्नेल फिलिप्सला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ७४ धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी मार्कस स्टॉयनिसने फिलिप्सला ३० धावांवर बाद करत तोडली. पण कॉनवेने त्याची फलंदाजीतील लय कायम ठेवली. पुढे जिमी निशमला साथीला घेतले आणि ४७ धावांची भागीदारी केली. पण निशम १५ चेंडूत २६ धावा करुन बाद झाला.

यानंतर कॉनवेने मिशेल सँटेनरसह फलंदाजी करता न्यूझीलंडला १८० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र कॉनवेचे शतक थोडक्यात हुकले. निर्धारित २० षटके पूर्ण झाल्याने कॉनवेला ९९ धावांवर नाबाद रहावे लागले. त्याच्या ९९ धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने २० षटकात ५ बाद १८४ धावा केल्या होत्या. कॉनवेने त्याची ९९ धावांची खेळी ५९ चेंडूच १० चौकार आणि ३ षटकारांसह पूर्ण केली.

आयपीएलमध्ये कॉनवे, सोधी अनसोल्ड 

या महिन्यात १८ तारखेला आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलाव पार पडला होता. या हंगामासाठी इश सोधी आणि कॉनवेनेही नाव नोंदवले होते. या दोघांची मुळ किंमत प्रत्येकी ५० लाख होती. मात्र या दोघांनाही कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

सुर्यकुमारने ताज्या केल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतरच्या आठवणी; म्हणाला, “तेव्हा मी एकटाच…”

वयाच्या चाळिशीत असलेल्या दिग्गजाने ‘अशी’ उडवली फलंदाजाची दांडी, पाहा त्याच्या ‘बुलेट थ्रो’चा व्हिडिओ

“मला वाटलं चहल माझ्याबरोबर मस्करी करत आहे’, टीम इंडियातील निवडीबद्दल तेवतियाने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---