न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 25 नोव्हेंबर) ऑकलंड येथे पार पडला. भारताविरुद्ध टी20 मालिका गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने पहिला वनडे सामना आपल्या नावावर केला. हा सामना त्यांनी 7 विकेट्सने खिशात घातला. या विजयात केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी सिंहाचा वाटा उचलला.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंड संघाने 47.1 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, सामना 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. (New Zealand won by 7 wickets against india 1st odi match)
Tom Latham and Kane Williamson master a memorable chase against India ⭐
Watch the #NZvIND ODI series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/eVO5qCY6fe pic.twitter.com/GBEpDunT9C
— ICC (@ICC) November 25, 2022
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम (Tom Latham) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 104 चेंडूंचा सामना करताना 145 धावा कुटल्या. हे शतक करताना त्याने 5 षटकार आणि 19 चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) यानेही मोलाचे योगदान दिले. त्याने 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 94 धावा चोपल्या. तसेच, संघाला विजय मिळवून दिला. या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेवॉन कॉनवे (24), फिन ऍलेन (22) आणि डॅरिल मिचेल (11) यांनीही यावेळी खारीचा वाटा उचलला.
भारताकडून गोलंदाजी करताना युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकात 66 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यानेही 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची वरची फळी चांगलीच लयीत दिसली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 76 चेंडूत 80 धावा चोपल्या. यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 72 आणि शुबमन गिल (Shubman Gill) याने 50 धावांचे योगदान दिले. तसेच, खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 37), संजू सॅमसन (36), रिषभ पंत (15) यांनी संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. यावेळी शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव अनुक्रमे 1 आणि 4 धावाच करू शकले.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. टीम साऊदी याने 10 षटकात 73 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर लॉकी फर्ग्युसन याने 10 षटकात 59 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त ऍडम मिल्ने यानेही 1 विकेट घेतली.
हा विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिग्गज इंग्लिश क्रिकेटपटू बनला बाप, लग्नाआधीच चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
वनडेत धवन-गिल जोडी सुपरहिट! आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल चक्कर