विश्वविजेत्या फ्रांसचा १९ वर्षीय फुटबॉलपटू किलियन एम्बापे त्याची फिफा विश्वचषकातील ३.५ कोटी रु. कमाई समाजसेवी संस्थेला दान करणार आहे.
फिफा विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या एम्बापेने विश्वचषकातील ७ सामन्यांमध्ये ४ गोल केले होते.
तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ब्राझीलच्या पेले यांच्यानंतर गोल कराणारा एम्बापे दुसरा युवा फुटबॉलपटू ठरला आहे.
मैदानावरील आपल्या आक्रमक खेळाने इतक्या कमी वयात जगभरात आपला प्रभाव पाडणाऱ्या एम्बापेच्या या कृतीने तो एक चांगल्या फुटबॉलपटू बरोबरच चांगला व्यक्ती असल्याचेही सिद्ध केले आहे.
रविवारी (१५ जुलै) फ्रांसने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला ४-२ असे पराभूत करत १९९८ नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एम्बापेने एक गोल करत फ्रांसच्या विजयात मोलाचे योगदाने दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…
फिफा विश्वचषक: विविध खेळांमधील दिग्गजांनी अंतिम सामन्याला लावली हजेरी