---Advertisement---

“मरणाच्या दारापासून ते टी20 विश्वचषक विजेता”, पाहा रिषभ पंतचा प्रेरणादायी प्रवास

On: बुधवार, जुलै 3, 2024 10:31 AM
---Advertisement---

ठीक मागील वर्षी ज्याला स्वत:च्या पायवर नीट उभारता येत नव्हते. त्या खेळाडूने टी20 विश्वचषक उचलला. 30 डिसेंबर 2022 साली झालेल्या कार दुर्घटनेनंतर ठीक 18 महिन्यानंतर रिषभ पंतने टी20 विश्वचषक फायनल जिंकला. अंतिम सामन्यात त्याची बॅट चालली नसली तरी त्याने तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात फलंदाजीत नंतर विकेटकीपरींग मध्ये शानदार कामगिरी केली आहे.

टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर तीन दिवसांनी रिषभ पंतने आपल्या खात्यावरुन व्हिडिओ शेअर केला आहे. जो सर्वासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. जेव्हा 30 डिसेंबरच्या रात्री रिषभ पंतच्या कारची दुभाजकाला धडकून अपघात झाली त्यावेळी कारला आग लागली होती. त्यातून रिषभ पंतर कसा तरी बाहेर पडला त्यामुळे रिषभ पंतचे जीव वाचले होते. पण या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्याला नीट स्वत;च्या पयावर उभारता येत नव्हते.

त्यावेळी रिषभ पंतची अवस्था पाहून सर्वजण तो पुन्हा क्रिकेट खेळणार नाही असे म्हणत होते. परंतु 14 महिन्यांनी रिषभ पंत तंदुरुस्त होऊन स्वत:ला तयार केले आणि नंतर क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि 18 महिन्यात विश्वविजेता संघाचा हिस्सा ठरला. यादरम्यान रिषभ पंतने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहले आहे की, ट्राॅफी जिंकल्याबद्दल धन्य, नम्र आणि कृतज्ञ. देवाची स्वतःची योजना आहे.

रिषभ पंत आयपीएल 2023 साठी उपल्बध नव्हता. पण 2024 च्या आयपीएलमधून पुन्हा आपल्या क्रिकेटला सुरुवात केली. आयपीएल मधून शानदार कामगिरी करत त्यांने फिटनेसचा नमुना भारतीय संघासमोर सादर केला. त्यामुळे त्याचे टी20 विश्वचषक 2024 साठी निवड झाली. टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सराव सामन्यात बांग्लादेशविरुद्ध अर्धशतक ठोकून संघामध्ये स्थान मिळवले. टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात संघासाठी त्याने निर्णायक खेळी खेळली होती. जो स्वतः उभा राहू शकला नाही त्याने ट्रॉफी उचलली ऋषभ पंतचा हा व्हिडिओ तुम्हालाही प्रेरित करेल

महत्तवाच्या बातम्या-

‘टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत’ झिम्बाब्वे क्रिकेटने केले टीम इंडियाचे खास पद्धतीने कौतुक
द्रविडची निवृत्ती, गंभीरबाबत अपडेट नाही; मग झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक कोण?
विद्या व्हॅली, विबग्योर इंटरनॅशनल स्कूलची बाजी – 17 वर्षांखालील गटात एसएनबीपी स्कूलचे वर्चस्व

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---