भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज (25 जानेवारी) रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही संघ काल 24 जानेवारी रोजी याठिकाणी पोहोचले होते. मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला होता. ज्यामध्ये सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या फलंदाजीतून स्फोटक अर्धशतकी खेळी दिसून आली. दरम्यान, दुसऱ्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे टीम इंडियाचा ताण वाढला आहे.
चेन्नईतील दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी 24 जानेवारी रोजी भारतीय संघाने संध्याकाळी एमए चिदंबरम स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस केले. यावेळी अभिषेक शर्माच्या घोट्याला (ANKLE) दुखापत झाली. पीटीआयच्या अहवालानुसार, क्षेत्ररक्षण सरावा दरम्यान अभिषेक शर्माचा घोटा मुरगळला त्यानंतर संघाच्या फिजिओने ताबडतोब त्याच्या दुखापतीची तपासणी केली. त्यानंतर अभिषेक ड्रेसिंग रूममध्ये गेला. त्यानंतर त्याने पुढे सरावात भाग घेतला नाही. अभिषेक ड्रेसिंग रूममध्ये परत आत जात असताना तो लंगडत असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, अभिषेकच्या दुखापतीबद्दल आणि ती किती गंभीर आहे, याबद्दल बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
🚨 ABHISHEK SHARMA DOUBTFUL FOR 2ND T20I 🚨
– Abhishek Sharma’s availablity for 2nd T20I Match vs England in doubtful. He twisted his right ankle in today’s practice session. (Express Sports). pic.twitter.com/FljFokKScC
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 24, 2025
पहिला टी20 सामना गमावल्यानंतर पाहुण्या इंग्लंड संघाने दुसऱ्या टी20 सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. ज्यात त्यांनी एक बदल केला. वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्सेचा संघात समावेश करण्यात आला आहे. जर आपण भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल बोललो तर, जर अभिषेक शर्मा बाहेर राहिला तर तिलक वर्माला सलामीवीर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ज्यामध्ये वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतो.
हेही वाचा-
IND vs ENG; दुसऱ्या टी20 सामन्यात मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणार का?
बाद होऊन परतलेला खेळाडू पुन्हा 5 मिनीटांनी फलंदाजीस, रणजी सामन्यात घडला भलताच प्रकार!
रोहित-रहाणे फ्लाॅप, शार्दुल ऑन टाॅप, लाॅर्ड ठाकूरची दमदार शतकी खेळी, मुंबई संकटातून बाहेर