---Advertisement---

नागपुर पोलिसांचा खाक्या! थेट टीम इंडियाच्या सदस्यालाच संघासोबत सामील होताना थांबवले!

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2025 7:34 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला उद्या 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ नागपूरला पोहोचले आहेत. वनडेपूर्वी सूर्यकुमारच्या यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 मालिकेत इंग्लंडला 4-1 ने पराभूत केले. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात वनडे मालिकेतही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा आक्रमक पवित्रा असला तरी यावेळी चेहरे वेगळे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या तयारी किती झाली आहे हे कळून येईल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या एका सदस्याला नागपूर पोलिसांनी पकडले. त्याला पकडण्याचे कारण असे की तो टीम इंडियाच्या सदस्यांपासून लांब (वेगळा) होता. हा सदस्य भारतीय संघाचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट रघु होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी रघुला अडवताना दिसत आहे. पोलिसांनी तो कोणीतरी चाहता असल्याचे समजून त्याला अडवले. रघु काही मिनिटे पोलिसांना समजवले. थोड्या वेळाने जेव्हा पोलिसांना त्याचे म्हणणे पटले तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिले.

रघु हा भारतीय संघासोबत जवळपास 14 वर्षांपासून आहे. रघु 150 ते 155 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्यात माहिर आहे. रघुने या माध्यमातून विराट कोहली, एमएस धोनी, केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंना तयारी करण्यास मदत केली आहे. त्यामुळे रघुचे संघासोबत असणे खूपच महत्त्वाचे आहे. सामन्यापूर्वी खेळाडू रघुच्या स्पीडचा सामना करतात आणि पुढची तयारी करत असतात. इंग्लंडचे जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड हे 145 किमी प्रतितासाने गोलंदाजी टाकण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी रघुसोबत थ्रोडाऊन सराव खूपच महत्त्वाचा आहे.

मालिकेच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना उद्या 6 फेब्रुवारीला नागपूरमध्ये, दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारीला कटकमध्ये, तिसरा वनडे सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. चॅम्पिन्स ट्राॅफीपूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी खूपच महत्त्वाची आहे.

हेही वाचा-

नशीब उजळले..! ‘हा’ खेळाडू होणार आयपीयल विजेत्या संघाचा कर्णधार;
‘हा’ स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात पाहिजे, पाहा काय म्हणाला रविचंद्रन अश्विन
भारतीय संघ कसा जिंकणार चॅम्पियन्स ट्राॅफी? माजी क्रिकेटपटूने सांगितले समीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---