पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या भूमीवर होणार आहे. या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलबाबत भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात करार झाला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत स्पर्धेच्या भवितव्याबाबत अटकळांना जोर आला आहे. दरम्यान आयसीसीच्या नव्या अध्यक्षांशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारलेले जय शहा ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. जिथे भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जय शाह यांनी काल 12 डिसेंबर रोजी 2032 ब्रिस्बेन ऑलिम्पिक आयोजन समितीच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. उन्हाळी खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. 2028 च्या लॉस एंजेल्स गेम्समध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. तर 2032 मध्ये ब्रिस्बेनमध्ये क्रिकेटचा समावेश अद्याप निश्चित झालेला नाही.
Very exciting time ahead for Cricket’s involvement in the Olympics movement – a meeting with the @Brisbane_2032 organizing committee in Brisbane, Australia today.@ICC | @Olympics | @CricketAus | @BCCI | #brisbane2032 pic.twitter.com/JVyMbkCYrz
— Jay Shah (@JayShah) December 12, 2024
जय शहा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ब्रिस्बेन 2032 च्या आयोजन समितीच्या प्रमुख सिंडी हुक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले या बैठकीला उपस्थित होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यावर तोडगा काढणे हे जय शहा यांच्या तात्काळ प्राधान्यांपैकी एक आहे. सर्व भागधारकांनी हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवली आहे. परंतु अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव शनिवारपासून गाबा येथे सुरू होणारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी क्रिकेट कसोटी पाहण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. आता तिसरी कसोटी उद्यापासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवली जाणार आहे.
हेही वाचा-
IND VS AUS; ब्रिस्बेन कसोटीत विराट कोहलीकडे हे तीन विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
27 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास, 1978 नंतर पहिल्यांदाच असा चमत्कार
IND vs AUS: गाबा कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, ॲडलेडमध्ये 5 विकेट्स घेणारा गोलंदाज बाहेर






