---Advertisement---

पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेवर टीम इंडियाचा मोठा निर्णय, सूर्याने निर्णायक भूमिका मांडली…

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 4:57 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून होणार असून, यंदा ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. 5 फेब्रुवारीला कर्णधारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होता. यावेळी त्याला 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ग्रुप सामन्याबाबत विचारले.

सूर्या म्हणाला, “आमचे विचार अगदी स्पष्ट आहेत. आम्ही पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला नाही; त्यांनी नकार दिला आहे. आमच्या विमानांचे बुकिंग झाले आहे आणि आम्ही कोलंबोला जात आहोत. आमचे सामने फिक्स आहेत: प्रथम अमेरिका, नंतर नेदरलँड्स आणि नंतर आम्ही कोलंबोला जाऊ.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही कोलंबोला जात आहोत आणि आमच्या विमानांचे बुकिंग झाले आहे.” तो पुढे म्हणाला, “त्यांच्या निर्णयावर आमचे नियंत्रण नाही. आम्हाला सांगण्यात आले आहे की आम्ही 15 फेब्रुवारी रोजी सामना खेळू. आम्ही आशिया कपमध्ये खेळलो आणि जर सामना झाला तर आम्ही 15 तारखेला खेळू.” स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सूर्याने टीम इंडियाच्या उत्कृष्ट फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला की, “आम्ही ड्रेसिंग रूमचे वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न करतो, वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ, ईशान किशनने 90 च्या पार धाव केल्या त्यानंतर त्याने षटकात मारून 100 पूर्ण केले. मैदानात असलेल्या खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.”

भारताविरुद्धच्या टी20 विश्वचषक 2026च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तानी संघाच्या निर्णयाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, “या विषयावर आमचे काहीही म्हणणे नाही. आयसीसीला या विषयावर निर्णय घ्यावा लागेल आणि आम्ही ते जे काही म्हणतील त्यानुसार पुढे जाऊ.”

टी20 विश्वचषक 2026च्या टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाला पाकिस्तान संघ दोष देत आहे. या प्रकरणाबाबत पीसीबीने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. जर पाकिस्तान संघाने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर त्यांना आयसीसीकडून मोठा दंडही भरावा लागेल. शिवाय हे लक्षात घ्यावे की पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकेत आला आहे, जिथे ते त्यांचे सर्व गट सामने कोलंबोमध्ये खेळतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---