बेंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत कसोटीमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ही कामगिरी 116 कसोटी सामन्यांच्या 197 डावात 9000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला. ज्यामध्ये त्याने 48+ सरासरीने या धावा केल्या आहेत. सामन्यात दुसऱ्या डावात कोहली आणि सर्फराज खान दोघांनी संघाले सावरले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने शानदार अर्धशतक झळकावले आहे. त्याचसोबत त्याने कसोटी करिअर मध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो आता भारताचा केवळ चाैथा फलंदाज ठरला आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याबात सचिन तेंडूलकर अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी आणि तिसऱ्या स्थानी राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांचा सामवेश आहे.
भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा
सचिन तेंडुलकर – 15,921
राहुल द्रविड – 13,265
सुनील गावस्कर – 10,122
विराट कोहली – 9000*
Virat Kohli – the GOAT. 🐐
– 4th Indian after Tendulkar, Dravid and Gavaskar to reach 9,000 Test runs. pic.twitter.com/81hRyWJRYh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2024
विराट कोहली कसोटीत 9000 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन, द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी भारतासाठी ही कामगिरी केली आहे. मात्र, कोहलीने कमीत कमी डाव खेळून ही कामगिरी केली आहे. त्याने आपल्या 197 व्या डावात ही कामगिरी केली. तसेच तो कसोटीत नऊ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा 18वा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहलीने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.
माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 116 सामने खेळले आहेत आणि 9000 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात 29 शतके आणि सात द्विशतकांचा समावेश आहे. त्याने 31 अर्धशतकेही केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 आहे.
हेही वाचा-
IND vs NZ: दुर्देवीचं म्हणावं..! रोहित शर्माची अनलकी विकेट; पाहा VIDEO
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? कर्णधारानं सांगितलं कारण
IND vs NZ: “धोनीकडून शिकावे….”, माजी क्रिकेटपटूचा कर्णधार रोहित शर्माला सल्ला….