---Advertisement---

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे १५ शिलेदार घोषित; भारतीय वंशाच्या अष्टपैलूला मिळाली संधी

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 10:33 PM
nz wtc win
---Advertisement---

सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाचा थरार सुरू आहे. विश्वचषकाची समाप्ती १४ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिकांना सुरुवात होणार आहे. विश्वचषकाचा समाप्तीनंतर न्यूझीलंड संघ भारत दौ-यावर येईल. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला तीन टी२० व दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यावरील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

गतविजेता आहे न्यूझीलंड संघ
न्यूझीलंड संघ या कसोटी मालिकेत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ ला सुरुवात करेल. ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विद्यमान विजेते आहेत. चालू वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. केन विलियम्सन हाच या संघाचे नेतृत्व करताना दिसून येईल. भारतीय वंशाचा अष्टपैलू रचिन रवींद्र याला प्रथमच कसोटी संघात निवडले गेले आहे.

असा असेल दौरा
विश्वचषकाच्या समाप्तीनंतर १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियम येथून टी२० मालिकेला सुरुवात होईल. दुसरा टी२० सामना १९ नोव्हेंबर रोजी रांची येथे तर, अखेरचा टी२० सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. उभय संघांमधील कसोटी मालिकेला २५ नोव्हेंबर रोजी कानपूर येथे सुरुवात होईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबरपासून मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक),  टॉम लॅथम, डेवॉन कॉनवे, कायले जेमिसन, हेन्री निकोलस, एजाज पटेल, ग्लेन फिलीप्स, रचिन रविंद्र, मिचेल सॅंटनर, विल सॉमरविले, टीम साऊदी, नील वॅग्नर, रॉस टेलर व विल यंग.

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविडच्या नियुक्तीनंतर भारतीय दिग्गज झाला आनंदित; ‘या’ शब्दात केले कौतुक

भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स होता? वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मांडले परखड मत

‘कमबॅक बॉय’ अश्विनबद्दल कॅप्टन कोहलीचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---