सध्या क्रिकेटविश्वात आशिया चषकाची चर्चा सुरू असतानाच, न्यूझीलंडचा प्रमुख टी20 फलंदाज ग्लेन फिलिप्सने आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (29 ऑगस्ट) फिलिप्सने त्याची प्रेयसी केट व्हिक्टोरियासोबत साखरपुडा करत असल्याची घोषणा केली. फिलिप्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट करून चाहत्यांना ही माहिती दिली. फिलिप्सने निसर्गाच्या सानिध्यातील व्हिक्टोरियासोबतची दोन छायाचित्रे पोस्ट केली आहेत.
https://www.instagram.com/p/Ch1geH6u1s6/?igshid=YmMyMTA2M2Y=
फिलिप्सने केलेल्या पोस्टला त्याने कॅप्शन देत लिहिले की, ‘ती हो म्हणाली. तुमचे लक्ष असेलच’ फिलिप्सच्या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
न्यूझीलंडमधील माउंट कूक नॅशनल पार्कमधील हूकर व्हॅली ट्रॅक्टमध्ये एका गुडघ्यावर बसून फिलिप्सने केटला प्रपोज केले. मागील महिन्यात फिलिप्सने केटसोबतची छायाचित्रे शेअर करून आपल्या नात्याची दोन वर्षे साजरी केली. केट आणि फिलिप्स सातत्याने एकमेकांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
ग्लेन फिलिप्स याला न्यूझीलंडच्या टी20 संघाचा उत्कृष्ट फलंदाज मानला जातो. त्याच्या नावे न्यूझीलंडसाठी सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने न्यूझीलंडसाठी एक कसोटी व 5 वनडे सामने खेळले आहेत. त्याचवेळी त्याच्या टी20 कारकिर्दीचा विचार केला तर त्याने 44 सामने खेळताना 31.09 च्या सरासरीने 964 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्येही राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.