---Advertisement---

WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान

On: रविवार, मे 16, 2021 11:38 AM
---Advertisement---

येत्या १८ ते २२ जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. भारतीय संघ येत्या २ जूनला इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. तर न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला सराव करण्याची देखील संधी मिळणार आहे.

यासोबतच न्यूझीलंड संघाचा आणखी एक फलंदाज सध्या इंग्लंडमध्येच आहे. त्याने कसोटी अजिक्यपद अंतिम सामन्यापुर्वी इंग्लंडच्या भूमीत सलग २ शतके झळकावत भारतीय संघाला आव्हान दिले आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट २०२१ स्पर्धेत डरहम काउंटी संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज विल यंग हा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याने १५ मे रोजी वॉस्टरशर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी शतक झळकावले आहे. तसेच हे त्याचे या हंगामातील सलग दुसरे शतक आहे.

झळकावले सलग २ शतक
सध्या डरमह विरुद्ध वॉरस्टरशर संघात चालू असलेल्या सामन्यात शनिवारी (१५ मे) डरहम संघाने दुसऱ्या डावात ५ गडी बाद ३८९ धावा करत डाव घोषित केला होता. याच संघासाठी सलामीला फलंदाजी करत असलेल्या विल यंगने २५२ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. हे त्याचे या हंगामातील सलग दुसरे शतक होते. यापूर्वी त्याने वॉरविकशर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १२४ धावांची खेळी केली होती.

अंतिम ११ मध्ये मिळू शकते संधी
यंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने न्यूझीलंड संघासाठी २ कसोटी सामने खेळले आहेत. त्याला या २ सामन्यात ४८ धावा करण्यात यश आले आहे. त्याने गतवर्षी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आगामी इंग्लंड दौरा आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये त्याची चमकदार कामगिरी पाहून भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

सध्याचा दमदार फॉर्म अन् भारताविरुद्धची शानदार कामगिरी, कसोटी मालिकेत इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू घालणार धुमाकूळ!

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: दमदार प्रदर्शनानंतरही ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना बसावे लागू शकते बाकावर

‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---