---Advertisement---

‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र

On: रविवार, मे 16, 2021 9:26 AM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना एक पत्र (ई-मेल) लिहून संघात ‘स्वकेंद्रित संस्कृती’ बदलण्याची गरज असल्याचा आरोप केला आहे. रमण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनाही हे पत्र पाठविले आहे. याबरोबरच रमण यांनी भारतीय महिला संघातील खेळाडूंचे वर्तण आणि त्यांच्यातील गर्विष्ठ स्वभावाबद्दलही पत्रात तक्रार केली आहे.

भारताचे माजी खेळाडू मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) काही दिवसांपुर्वी रमेश पोवार यांना राष्ट्रीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. गतवर्षी टी-20 विश्वचषकात रमण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ उपविजेता ठरला होता. तरीही त्यांना संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवण्यात आले आहे.

यावर रमण यांच्या ई-मेलबद्दल माहिती असलेल्या एका सुत्राने सांगितले की, ‘माझ्या माहितीनुसार रमण यांनी लिहिले आहे की, त्यांनी नेहमीच सर्वांपेक्षा संघाला वरचढ ठेवण्याचे काम केले आहे. त्यांचं स्पष्ट मत आहे की कोणतीही व्यक्ती स्वार्थी होऊ शकत नाही.’

रमण यांनी दोन माजी कर्णधारांना पत्र लिहिले आहे आणि यामुळे काही प्रमाणात वाद उद्भवू शकतात. कारण खेळाडूंशी मतभेद झाल्यास प्रशिक्षकांना नेहमीच बलिदान द्यावे लागते. विशेषत: मिताली राजच्या बाबतीत असे झाले होते. जरी रमण यांनी या पत्रात कोणाचेही नाव घेतलेले नाही, परंतु संघात प्रचलित स्टार संस्कृतीबद्दल त्यांनी सविस्तरपणे चर्चा केल्याचे समजते.

सुत्रांनी सांगितले, ‘रमण यांनी दादांना (गांगुली) सांगितले आहे की जर एखाद्या माजी खेळाडूला या संस्कृतीत गुदमरल्यासारखे वाटत असेल तर भारताचा माजी कर्णधार म्हणून त्यांनी (गांगुलीने) या विषयावर निर्णय घ्यावा.’

प्रशिक्षक म्हणून सक्रिय नसल्याचा आरोप रमण यांनी फेटाळून लावला आहे. रमण यांनी आठवन करून दिली की मागील वर्षी टी-20 लीग दरम्यान त्यांनी युएईच्या आर्द्र परिस्थितीत दुपारी 1 ते 9 या वेळेत तीन संघांच्या प्रशिक्षनाचे निरीक्षण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

तो कधीही जिंकता सामना खेचून घेऊ शकतो; भारताच्या ‘या’ धुरंधराची इंग्लिश दिग्गजाला वाटते भिती

भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?

पक्काच समझा! कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना ‘हा’ संघच जिंकणार; पाहा कसं ते?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---