आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला धूळ चारली आणि ८ गडी राखून विजय मिळवला. यासह जेतेपद देखील पटकावले. आता न्यूझीलंड संघासमोर पुढील आव्हान भारतीय संघाचे असणार आहे. १७ नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जयपूरमध्ये पोहोचला आहे. तसेच या मालिकेत न्यूझीलंड संघाला विलागिकरणात राहावे लागणार नाहीये. काय आहे यामागचे कारण? जाणून घेऊया.
न्यूझीलंड संघ यूएई आणि ओमानमध्ये झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. हे खेळाडू गेल्या कित्येक महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. तसेच न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी यूएईवरून भारतात येण्याचा प्रवास चार्टर्ड विमानाने केला आहे. ज्यामुळे ते एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे त्यांना विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करण्याची आवश्यकता भासणार नाहीय.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये १७ नोव्हेंबरपासून जयपूर येथे टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. राजस्थान क्रिकेट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “न्यूझीलंड संघ संध्याकाळी इथे पोहोचला असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. उद्यापासून (१६ नोव्हेंबर) संघ सरावाला सुरुवात करणार आहे.”
तसेच न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले की, “पहिल्यांदाच आम्ही टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहोत. नक्कीच हे कठीण आणि आव्हानात्मक असणार आहे. परंतु, आम्हाला याचा सामना करावा लागणार आहे. कसोटी संघातील ९ सदस्य इथे आधीच पोहोचले आहेत. जे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे.”
टी२० मालिकेसाठी केन विलियम्सन मुकणार आहे. तो २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताविरुद्ध खेळताना दिसेल. त्याच्याऐवजी टिम साऊथी टी२० मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करेल.
टी२० मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ –
टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी, टिम साऊथी.
टी२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी
‘या’ दिवशी २०२२ टी२० विश्वचषकाला होणार सुरुवात; ऑस्ट्रेलियातील सात शहरात आयोजन, आयसीसीची घोषणा






