इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर सोमवारी संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सामन्यादरम्यान वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. याचा आधार घेऊन इंग्लंडचा माजी सलामीवीर निक कॉम्प्टन याने भारतीय कर्णधार विराट कोहलीबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
कॉम्प्टनचे विराटबाबत वादग्रस्त ट्विट
भारतीय संघाच्या विजयानंतर सर्व आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे व संघाच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक करत आहेत. इंग्लंडचा माजी सलामीवीर निक कॉम्प्टन याने भारतीय कर्णधार विराट कोहलीबाबत एक वादग्रस्त ट्विट केले. त्याने लिहिले,
‘विराट हा सर्वात उर्मट खेळाडू नाही का? २०१२ दौऱ्यावेळी त्याने वापरलेले शब्द मी अजूनही विसरलो नाही. त्यावेळी त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. रूट, सचिन व विलियम्सन हे खेळाडू किती शांत डोक्याने खेळतात.’
निक कॉम्प्टन याने २०१२ भारत दौऱ्यावर ऍलिस्टर कूकसोबत इंग्लंडसाठी सलामीवीराची भुमिका पार पाडलेली. कॉम्प्टनने २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत छायाचित्रकार म्हणून नवी कारकीर्द सुरू केली आहे.
https://twitter.com/thecompdog/status/1427973637865361408?s=19
सामन्यात झाला भरपूर संघर्ष
लॉर्ड्स कसोटीत खेळाव्यतिरिक्त भरपूर स्लेजिंग झाली. इंग्लंडच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसन फलंदाजी करत असताना भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला सहजपणे आखूड टप्प्याचे चेंडू टाकत हैराण केले. ही गोष्ट अँडरसनला आवडली नव्हती. या सामन्यात मोहम्मद सिराज व जॉनी बेअरस्टो यांच्या दरम्यानही शाब्दिक युद्ध रंगले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सन याला देखील भारतीय गोलंदाजांनी लक्ष केले. भारताच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी फलंदाजी करत असताना सर्व इंग्लिंश खेळाडू त्यांना स्लेज करत होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा; मलानचे पुनरागमन, तर ‘या’ खेळांडूना वगळले
‘लॉर्ड’ शार्दुल उर्वरित मालिकेत बसून राहणार बाकावर? ‘हे’ आहे कारण
‘इंग्लंड हा पराभव विसरणार नाही’, लॉर्ड्स कसोटीबाबत माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य






