---Advertisement---

धक्कादायक! अनेक भारतीय धावपटूंच्या यशात मोलाचे योगदान देणारे प्रशिक्षक वसतिगृहात आढळले मृतावस्थेत

On: शनिवार, मार्च 6, 2021 12:31 AM
---Advertisement---

ऑलिंपिक २०२१ ची स्पर्धा काही महिन्यांवरच येऊन ठेपली असतानाच भारताच्या ऍथलेटिक्स संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचे मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंचे प्रशिक्षक निकोलई स्त्रसारेव हे राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळले आसल्याचे वृत्त समोर येत आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचेही समजत आहे.

बेलारुसचे स्त्रसारेव हे ७२ वर्षीय प्रशिक्षक असून २ वर्षांनी भारतात प्रशिक्षक म्हणून परतले होते. ते प्रशिक्षक म्हणून सप्टेंबर पर्यंत कार्यरत राहाणार होते.

त्यांच्या निधनाबद्दल ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) दु:ख व्यक्त केले आहे. एएफआयचे अध्यक्ष आदिल जे सुमारिवाला यांनी म्हटले आहे की ‘आम्हाला प्रशिक्षक निकोलई स्त्रसारेव यांच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला आहे. ते काही दिवसांपूर्वीच भारतात आले होते. ते स्टिपलचेसर अविनाश साबळेला यावर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत होते. त्यांच्या आम्ही भारतीय ऍथलेटिक्सशी असलेल्या त्याच्या दीर्घ सहवासाबद्दल नेहमीत आदर बाळगू आणि त्यांची कमी आम्हाला भासत राहिल.’

स्त्रसारेव हे २००५ पासून भारतातील धावपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी १० हजार मीटर प्रकारात धावणारी प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी स्टिपलचेसर सुधा सिंगला २५ लॅप रेसमध्ये सुवर्णपद जिंकण्यासाठी मार्गदर्शन केले होते.

याबरोबरच त्यांनी ललिता बाबरला स्टिपलचेसकडे वळण्याचा सल्लाही दिला होता. तिनेही हा सल्ला योग्य ठरवत ऑलिपिंकच्या २०१६ सालामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. असे करणारी ती पीटी उषा यांच्यानंतरची पहिली भारतीय धावपटू ठरली होती. याशिवाय त्यांनी अनेक भारतीय धावपटूंना मार्गदर्शन केले आहे.

त्यांच्या निधनाबद्दल पीटी उषा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.

स्त्रसारेव हे ३००० मीटर स्टिपलचेसर अविनाश साबळेला सध्या प्रशिक्षण देत होते. तो टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: वय झालं तरीही वाघ तो वाघच! चाहत्यांना पुन्हा दिसले विरुचे जुणे रुप, पहिल्याच चेंडूवर ठोकला जबरदस्त चौकार

युवराज पुन्हा ऑन फायर! बांगलादेशच्या दोन फलंदाजांना केले क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ

भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---