भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि त्याचे कुटुंबीय सध्या खूप अस्वस्थ आहेत. नीरज आजारी पडला आहे, कारण सततच्या अभिनंदन सोहळ्यांमुळे तो खूप थकला आहे. तो मंगळवारी (17 ऑगस्ट) इतका अस्वस्थ झाला की, त्याला एक कार्यक्रम अर्ध्यात सोडावा लागला. टोकियोहून आल्यानंतर लागोपाठ कार्यक्रमांमध्ये सहभागी होत गेल्याने त्याची प्रकृती खालावली आहे. त्याच्या कुटुंबाच्या मते, या सगळ्याचा नीरजच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत आहे. तो 2-3 तासांपेक्षा जास्त झोपू शकत नसल्यामुळे त्याची तब्येत बिघडली आहे.
कुटुंबाच्या जवळच्या सदस्याने एका वृत्तपत्राला सांगितले, “चांगली विश्रांती घेतल्यानंतर तो बरा होईल. खबरदारी म्हणून आम्ही त्याला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ न द्यायचे ठरवले आहे. टोकियोहून परतल्यानंतर प्रत्येक दुसऱ्या दिवशी काही ना काही कार्यक्रम असायचे. वेगवेगळ्या माध्यमांच्या वाहिन्यांशी त्याच्या मुलाखती झाल्या. त्याला थोडीही विश्रांतीची संधी मिळाली नाही. खेळाडूच्या शरीरालाही विश्रांतीची गरज असते. विशेषतः ऑलिम्पिकसारख्या मोठ्या कार्यक्रमानंतर. त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याच्या बातम्या आल्या त्या अफवा आहेत. हे खरे नाही. टोकियोहून आल्यानंतर, एकापाठोपाठ एक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर त्याला खूप थकवा जाणवत आहे.”
पानिपतमधील त्याच्या मूळ गावानजीक एका कार्यक्रमात सहभागी होत असताना थकवा आणि तापामुळे नीरजला हा कार्यक्रम मधूनच सोडावा लागला होता. एका वृत्तानुसार, नीरज चोप्राला ताप, चक्कर येणे आणि घसा खवखवल्याची तक्रार होती. या कार्यक्रमाच्या वेळी त्याच्या शरीराचे तापमान 100F वर गेले होते. 23 वर्षीय निरजला पॅरासिटामोल आणि इलेक्ट्रोलाइट्स देण्यात आले. तसेच त्याला तातडीने आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
निरजने सर्वप्रथम खंडारापासून पाच किलोमीटर अंतरावरील खुकराणा गावात पोहोचल्यानंतर अस्वस्थतेची तक्रार केली. तेथे त्याला चांदीचा भाला देण्यात येणार होता. पण चक्कर आणि डोकेदुखीची तक्रार आल्यावर त्याने समारंभ अर्ध्यावर सोडला. नीरज चोप्राला गेल्या शुक्रवारीही खूप ताप आला होता. तेव्हा त्याने कोरोनाची RT-PCR चाचणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
एका कार्यक्रमादरम्यान नीरज हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत दिसला होता. या दरम्यान नीरज म्हणाला होता, “मी हरियाणाला ऑलम्पिकसाठी क्रीडापटू तयार करण्याचं प्रमुख केंद्र बनवण्याचा प्रयत्न करेन. देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. सध्या माझे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजमध्ये दिसली कोरोना सदृश्य लक्षणे, चाचणीचा अहवाल आला….
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
एकेकाळी टोकियो आलिंपिक खेळण्याची आशा सोडलेल्या नीरज चोप्राने भावनिक पोस्ट करत मानले ‘यांचे’ आभार