कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. श्रीलंकेने या सामन्यात तीन गडी गमावून भारतीय संघाने दिलेले ८२ धावांचे आव्हान पंधराव्या षटकात पूर्ण करून २-१ ने मालिका विजय मिळवला. या पराभवानंतर याच दौर्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या नितीश राणा याने एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट केली.
नितीश राणाची भावनिक पोस्ट
आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा खेळणाऱ्या यु्वा नितीश राणाने टी२० मालिकेतील पराभवानंतर एक सोशल मीडिया पोस्ट केले. त्याने लिहिले, ‘आपला सोशल मीडिया केवळ आपले विजय सामायिक करण्यासाठी नाही तर, आपले अपयश सामायिक करण्यासाठी देखील आहे. हा दौरा मी ठरविल्याप्रमाणे किंवा माझ्या कल्पनेनुसार गेला नाही. मात्र, या तीन सामन्यांमधून मी बरेच काही शिकलो आहे. मी जेव्हा हातात बॅट उचलली तेव्हापासून मी नेहमीच नशिबापेक्षा कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवला असून, यामुळे मी थांबणार नाही.’
‘लोक माझ्याबद्दल बरेच काही सांगतील. माझ्याविषयी बरेवाईट बोलतील. परंतु, मी या गोष्टींमुळे खचणार नाही. कारण, मला हे माहित आहे की यासाठी मी किती कठोर परिश्रम घेतले आहेत. मी पुढे जात राहीन, बळकट होत राहीन आणि माझ्या संघासाठी आणि स्वतःसाठी जिंकत राहिल,’ असेही त्याने लिहिले.
https://www.instagram.com/p/CR6–EBLJlh/?utm_source=ig_web_button_share_sheet
राणाने केले श्रीलंका दौऱ्यातून पदार्पण
नितीश राणाने वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. राणाला पदार्पणाच्या सामन्यात फक्त सात धावा करता आल्या. यानंतर त्याने टी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळले. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ९ आणि ७ धावांचे योगदान दिले. नितीश इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी (केकेआर) खेळतो. मागील दोन आयपीएल हंगामातील कामगिरीच्या जोरावर त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी संघात निवडले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हसरंगाची ‘लॉटरी’! आयपीएलचे ‘हे’ ३ संघ देऊ शकतात संधी
आहा कडक! नव्या लूकमध्ये अजूनच तरुण दिसतोय ‘कॅप्टनकूल’ धोनी, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट