भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीसह संपूर्ण संघ सध्या कसोटी सामन्यांची जोरदार तयारी करत आहेत. त्याचबरोबर संघातील सर्व खेळाडू आपल्या परिवारासह इंग्लंडमध्ये मज्जा-मस्ती करताना दिसून येत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर अनेक खेळाडू आपल्या कुटुंबीयांसह गेले आहेत.
कर्णधार विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील या दौऱ्यावर गेले आहेत. त्याचबरोबर केएल राहुलसोबत त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी देखील इंग्लंडमध्ये आहे. ईशांत शर्मा, मयंक अग्रवाल, उमेश यादव हे सुद्धा आपापल्या परिवारासोबत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत.
याच दरम्यानचा एक फोटो केएल राहुलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशांत शर्मा, विराट कोहली, मयंक अग्रवाल आणि उमेश यादव देखील दिसून येत आहेत.
केएल राहुलने या फोटो व्यतिरिक्त आणखी एक फोटो शेअर केला आहे, जो पडद्यामागील फोटो आहे. या फोटोमध्ये अथिया शेट्टी फोटो क्लिक करताना दिसत आहे. तर उमेश यादवची पत्नी तान्या, कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा, इशांतची पत्नी प्रतिमा, मयंक अग्रवालची पत्नी आशिता या सर्वजणी देखील तिच्यासोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये बीसीसीआय टीव्हीची ज्येष्ठ निर्माता रजत अरोडा देखील आहे.
हा फोटो शेअर करत केएल राहुलने ‘स्वाइप राईट’. या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.
भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी खेळलेल्या एकमेव सराव सामन्यात केएल राहुलने शतक केले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हसरंगाची ‘लॉटरी’! आयपीएलचे ‘हे’ ३ संघ देऊ शकतात संधी
आहा कडक! नव्या लूकमध्ये अजूनच तरुण दिसतोय ‘कॅप्टनकूल’ धोनी, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
टी२० विश्वचषकासाठी झहीर खानने निवडला १५ सदस्यीय भारतीय संघ, बघा कोण इन कोण आऊट