जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, याचा फटका सर्वच क्षेत्राला बसतोय. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. त्याच कारणामुळे आयपीएल 2021 हंगामालाही 29 सामन्यांनंतर देखील स्थगिती दिली आहे. कारण खेळाडूंना देखील कोरोनाची लागण होत होती. पण जरी हा हंगाम स्थगित झाला असला तरी सध्या खेळाडूंचे काही जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकताच नितीश राणाचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला.
नितीश राणाने आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आयपीएलमध्ये राणा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. आयपीएल 2021 सुरु असताना बायोबबलमध्ये खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली होती. अनेक खेळाडू आपली पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. याच दरम्यानचा नितीश राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ राणाची पत्नी साची मारवाहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. यामध्ये साची पती राणाला पाठीवर घेऊन हॉटेलमध्ये वर्कआऊट करताना दिसते. हा व्हिडीओ आयपीएल 2021च्या वेळेसचा आहे. राणा केकेआरच्या जर्सीमध्ये दिसत आहे. राणाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बऱ्याच धावा बनवल्यानंतर काही दिवसांपूर्वी राणा म्हणाला की, तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास तयार आहे. रानाला जुलै महिन्यात श्रीलंका दौ-यात संधी मिळायची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन, द्रविड व गांगुलीला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, पाहा काय आहे त्याचे नाव
‘हिटमॅन’च्या प्रशिक्षकाने २०११ विश्वचषकावेळी दिला होता यशाचा मंत्र, त्यानंतर रोहितचा झाला ‘रो-हिट’
चोवीस वर्षांपूर्वी चेपॉकवर घडलेला इतिहास, भारताविरुद्ध ‘या’ फलंदाजाने केलेली तुफान फटकेबाजी