मोहाली। आज(10 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनने 193 धावांची सलामी भागीदारी रचत दमदार सुरुवात करुन दिली होती. रोहितने 95 धावांची अर्धशतकी तर शिखर धवनने 143 धावांची शतकी खेळी केली.
मात्र या दोघांच्या खेळीबरोबरच जसप्रीत बुमराहने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर युजवेंद्र चहल बाद झाल्याने बुमराह 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने आल्याआल्या पहिल्याच चेंडूवर हा षटकार मारला.
त्यामुळे तो वनडेमध्ये भारताकडून डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारणारा 11 व्या क्रमांकाचा दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी व्यंकटेश प्रसाद यांनी 2000 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता.
या षटकारामुळे बुमराहचा या सामन्यातील स्ट्राइक रेट हा 600 एवढा झाला आहे. एका वनडे सामन्यात डावाच्या शेवटी 600 चा स्ट्राइक रेट असणारा बुमराह हा एकूण नववा फलंदाज ठरला आहे. याआधी वासिम अक्रम(1989), अकीब जावेद(1995), व्यंकटेश प्रसाद(2000), युसुफ पठाण(2008), मोहम्मद शमी(2013), ख्रिस जॉर्डन(2014), वाहब रियाज(2015) आणि शादाब खान (2018) यांनी हा कारनामा केला आहे.
या फलंदाजांपैकी फक्त जावेद, प्रसाद आणि बुमराह हे 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–बुमराहचा तो षटकार पाहुन कर्णधार कोहलीही झाला अचंबित, केले असे सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
–अशी आहे किंग कोहलीची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतानाची कामगिरी
–मोहाली वनडेत शानदार शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवनने केले हे ५ गब्बर पराक्रम