---Advertisement---

सलग दुसऱ्या वर्षी आशिया चषक आयोजनात अडथळा, पाकिस्तानचा विरोध

On: शनिवार, मार्च 13, 2021 2:19 PM
---Advertisement---

आशियामधील सर्वात प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक यावर्षी देखील होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षी कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आलेली. पाकिस्तानमध्ये नियोजित या स्पर्धेत भारताने सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर, श्रीलंकेत ही स्पर्धा खेळण्याचे नक्की झाले होते. मात्र, यावेळी देखील ही स्पर्धा होण्याची शक्यता मावळू लागली आहे.

पाकिस्तानने घातला खोडा
आगामी आशिया चषकाचे आयोजन जून महिन्यात श्रीलंकेत करण्याचे ठरले होते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यामध्ये खोडा घातला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रॅंचाईजींना सांगितले आहे की, आम्ही जूनमध्ये होणाऱ्या अशिया चषकाच्या विरोधात आहोत.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी पीएसएल फ्रॅंचाईजींशी केलेल्या चर्चेमध्ये म्हटले आहे की,
“पीएसएलच्या सहाव्या हंगामातील उर्वरित सामने जून महिन्यात खेळवले जातील. यावर्षी आशिया चषक होण्याची शक्यता कमी आहे. स्पर्धेत सहभागी होणारे संघ इतर नियोजित मालिका खेळणार असल्याने २०२३ मध्येच आशिया चषकाचे आयोजन होऊ शकते.”

भारताचा देखील विरोध
पाकिस्तान सोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळदेखील आशिया चषकात खेळू इच्छित नाही. त्याऐवजी, २०२१ टी२० विश्वचषकाआधी न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका भारत खेळू इच्छितो. आशिया चषकाच्या नव्या तारखांची घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढील बैठकीत होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG: तयारी विना मैदानात उतरली ‘विराटसेना’! दारुण पराभवानंतर कोहलीने दिली कबुली

इंग्लिश गोलंदाजांकडून भारतीय सलामीवीरांना गुलीगत धोका, पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की

सरकारी नोकरी असेल तरच कॅमेरात पाहा!! स्टेडियममधील ‘त्या’ सुंदरीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, होतेय ट्रेंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---