---Advertisement---

या कारणामुळं टीम इंडियाची विजयी परेड रद्द, बीसीसीआयकडून अनपेक्षित उत्तर

On: मंगळवार, मार्च 11, 2025 6:29 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 जिंकून देशवासीयांना अभिमानाचा क्षण दिला, मात्र यंदा विजयी संघासाठी कोणतीही खुली बस परेड किंवा मोठा सत्कार समारंभ आयोजित केला जाणार नाही. यामागील मोठे कारण समोर आले आहे.

टी20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघ बार्बाडोसहून विशेष विमानाने भारतात परतला होता, मात्र यंदा असे झाले नाही. चॅम्पियन्स ट्राॅफीच्या विजयानंतर खेळाडू वेगवेगळ्या पध्दतीने भारतात पोहोचले. रिषभ पंत दिल्लीला, रोहित शर्मा मुंबईत, तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती चेन्नईत उतरले. इतरही काही खेळाडू वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचले आहेत. संघ एकत्र नसल्याने पूर्वीप्रमाणे भव्य स्वागत समारंभ आयोजित करणे कठीण ठरले आहे.

भारतीय संघ मागील काही महिन्यांपासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त होता. आता 22 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडू त्यांच्या फ्रँचायझीकडे रवाना होतील. कमी वेळ आणि व्यस्त वेळापत्रकामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मोठा समारंभ घेणे शक्य झाले नाही.

यापूर्वी जेव्हा भारताने टी20 विश्वचषक 2024 जिंकला होता, तेव्हा मुंबईत वानखेडे स्टेडियमपर्यंत खुली बस परेड आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण मुंबईतील चाहते रस्त्यावर उतरून विजयी संघाचं जल्लोषात स्वागत करत होते. मात्र यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी कोणतीही योजना करण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भविष्यात, आयपीएल 2025 दरम्यान किंवा त्यानंतर खेळाडूंचा सन्मान करू शकते. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी हा एक मिनी वर्ल्ड कप मानला जातो आणि त्याच्या विजयाचा साजरा न होणं ही चाहत्यांसाठी मोठी निराशा आहे.

हेही वाचा-

मुंबई इंडियन्ससाठी अंतिम संधी, RCB बनणार अडथळा?
“मी प्रार्थना करतो की RCB आयपीएल ट्राॅफी जिंकू नये” ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान!
ICC ने स्पष्ट केले कारण, चॅम्पियन्स ट्रॉफी फाइनलमध्ये PCB अधिकाऱ्यांची अनुपस्थिती का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---