भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. काही दिग्गज खेळाडूंनी असे काही रेकाॅर्ड त्यांच्या नावावर केले आहेत की, ते अजूनही तसेच आहेत. ते रेकाॅर्ड अद्याप कोणताही भारतीय दिग्गज खेळाडू तोडू शकला नाही, या बातमीद्वारे आपण ‘लिटिल मास्टर’ नावाने ओळखल्या जात असलेल्या सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा रेकाॅर्ड पाहणार आहोत. जो रेकाॅर्ड कोहली आणि सचिनला देखील मोडीत काढता आला नाही.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कसोटी क्रिकेटच्या 214 डावांमध्ये 51.12च्या उत्कृष्ट सरासरीने फलंदाजी करत 10,122 धावा केल्या, ज्यामध्ये एकूण 45 अर्धशतके आणि 34 शतकांचा समावेश आहे. गावसकर यांच्या नावावरही एक खास रेकाॅर्ड आहे आणि आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
A Mammoth Effort!#OnThisDay in 1979, with Sunil Gavaskar’s 221, India almost chased 438 to win at The Oval v England. They ended at 429 for 8.
This was also the last Test of @BishanBedi who represented India in 67 Tests (266 Wickets – most by any slow left-arm bowler from… pic.twitter.com/PgwdFlQhT8
— Cricketopia (@CricketopiaCom) September 4, 2024
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी एका कसोटी सामन्यात शतक आणि द्विशतक झळकावले आहे. गावसकर यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला आजपर्यंत अशी कामगिरी करता आली नाही. या दिग्गज खेळाडूने (एप्रिल 1971) मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात शतकासह 124 धावा केल्या तर दुसऱ्या डावात द्विशतकाच्या जोरावर 220 धावा केल्या.
जागतिक स्तरावर आपले नाव उच्च ठिकाणी नेवून ठेवलेल्या दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) देखील आजपर्यंत गावसकरांचा हा रेकाॅर्ड मोडीत काढता आला नाही. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके आहेत, तर कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीतील आपल्या कामगिरीवर नाखूश हे गिल; म्हणाला, “जेव्हा मी मागे वळून पाहिल, तेव्हा…”
कोहली की रूट उत्कृष्ट फलंदाज कोण? माजी दिग्गजाने केले खळबळजनक वक्तव्य
पाकिस्तानवरील मालिका विजयानंतर शाकिब मायदेशी परतणार नाही, समोर आलं मोठं कारण