रशिया। 21व्या फिफा विश्वचषकात जे संघ बाकी आहेत त्यातील सर्वच खेळाडूंनी तर फिफा विश्वचषक कधीच जिंकला नाही आणि काही खेळाडू कधीच अंतिम फेरीत पोहचले नाही.
गतविजेता जर्मनी आणि 2010चा विजेता स्पेन हे बाद फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्याने ते फिफा स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडल्याने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत नवे चेहरे दिसत आहेत. यांमधील किमान एक संघ मागील अर्ध्या शतकापासून विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीतच नव्हते.
उपांत्यपूर्व फेरीचे पहिले दोन सामने 6 जुलैला उरूग्वे विरूद्ध फ्रान्स आणि ब्राझिल विरूद्ध बेल्जियम असे होणार आहेत.
जर ब्राझिलने बेल्जियमला या सामन्यात पराभूत केले तर त्यांना विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.
तसेच उर्वरीत दोन सामने 7 जुलैला रशिया विरूद्ध क्रोएशिया असा होणार आहे. मात्र आज (3 जुलै) स्वीडन विरूद्ध स्वित्झर्लंड आणि कोलंबिया विरूद्ध इंग्लंड असे उप-उपांत्यपूर्व सामने असल्याने कोणते दोन संघ उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश करणार हे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: ५० वर्षात कधीही विश्वचषक न जिंकलेले संघ दिसणार अंतिम फेरीत
–फिफा विश्वचषक: ब्राझिलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताच केला खास पराक्रम








