---Advertisement---

ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 11:18 AM
Pak-Team
---Advertisement---

आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. आफ्रिदीच्या दुखापतीने टीम इंडियाने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. पण, या एका गोलंदाजाच्या अनुपस्थितीमुळे भारताचा त्रास कमी होईल, असे वाटत नाही, कारण पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाजांची संख्या जास्त आहे, जे आशिया कपच्या सामन्यात टीम इंडियाचे तणाव वाढवू शकतात. असाच एक गोलंदाज म्हणजे १९ वर्षीय नसीम शाह.

नसीम शाहने नेदरलँड्सविरुद्ध वनडे पदार्पण केले आहे. पण, केवळ ३ सामन्यांमध्ये या गोलंदाजाने आपली क्षमता सिद्ध केली. नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नसीमने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यामुळे शाहीनच्या अनुपस्थितीत नसीमला संधी मिळाल्यास तो भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
न्यूझीलंड क्रिकेटमधील सुवर्णक्षण! इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा
झिम्बाब्वेला पराभवासह शेवट करावा लागणार? ‘हा’ धाकड भारतीय खेळाडू तिसऱ्या वनडेत खेळणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---