आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये पार पडला. या लिलवाता भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रुट याने देखील यावेळी आयपीएल लिलावासाठी त्याचे नाव दिले होते. मात्र, लिलावातवेळी मात्र एकही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्याची इच्छा दाखवली नाही. परिणामी लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला खरेदीदार मिळाला नाही. रुटची बेस प्राईज 1 कोटी रुपये असून दुसऱ्या फेरीत ही रक्कम कमी होऊ शकते.
England's Joe Root is NEXT with a base price of INR 1 Crore
He goes UNSOLD #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
जो रुट (Joe Root) इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज असून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव देखील आहे. मागच्या काही आयपीएल हंगामांपासून रुट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, यावर्षी त्याने लिलिवात प्रत्यक्ष सहभाग घेतला असून देखील एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. आता दुसऱ्या फेरीत सर्व अनसोल्ड खेळाडूंवर पुन्हा एकदा बोली लावली जाईल, तेव्हा रुटला खरेदीदार मिळतो की नाही, हे पाहण्यासारखे असेल.
रुटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 127 कसोटी सामन्यांमध्ये 10629 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 28 शतकांचा, तर 55 द्विशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडसाठी 158 सामन्यांमध्ये 6207 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याने 16 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत. इंग्लंडच्या या कसोटी फलंदाजांना आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 32 सामने खेळले असून या फॉरमॅटमध्ये 893 धावा केल्या आहेत. (No team has bid to buy Joe Root in the IPL 2023 auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गतविजेत्या गुजरात टायटन्सची पहिली खरेदी, विलियम्सनला ताफ्यात घेण्यासाठी खर्च केले ‘एवढे’ कोटी
IPL Auction 2023: मागील लिलावापेक्षा यंदाच्या खर्चात 350 कोटी रुपयांची कपात! जाणून घ्या कारण






