अबुधाबी येथे झालेल्या अबुधाबी टी१० लीगच्या अंतिम सामन्यात नॉदर्न वॉरियर्सने दिल्ली बुल्सवर आठ गड्यांनी मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. युवा फिरकीपटू महीश थिकसाना अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. वॉरियर्सचे हे या स्पर्धेचे दुसरे जेतेपद आहे. संघाने यापूर्वी २०१८ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.
वॉरियर्सच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी
वॉरियर्सचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. योनीचा वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दिकी याने बुल असला सुरुवातीचे धक्के देत शानदार सुरुवात करून दिली. युवा फिरकीपटू महीशने बुल्सची मधली फळी कापून काढली. तसेच, धनंजय लक्षन याने देखील दोन बळी मिळवले. नियमित अंतराने गडी बाद झाल्याने दिल्ली बुल्स संघ निर्धारित दहा षटकांत केवळ ८१ धावा बनवू शकला. मोहम्मद नबीने सर्वाधिक २१ धावांचे योगदान दिले.
फलंदाजांनी मिळवून दिले जेतेपद
दिल्ली बुल्सने दिलेले ८२ धावांचे आव्हान पार करण्यासाठी सलामीवीर म्हणून कर्णधारपद निकोलस पूरन व मोहम्मद वसीम ही जोडी मैदानात उतरली. कोणतीही घाई न करता दोघांनी संघाला शानदार सुरुवात दिली. पूरन १२ तर वसीम २७ धावा काढून बाद झाला. लेंडल सिमन्स व रोवमन पॉवेल यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करत १० चेंडू राखून संघाला विजयी केले.
हे ठरले स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
कलंदर्स या संघाचा कर्णधार सोहेल अख्तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने २४८ धावा बनविल्या. तसेच, टीम अबुधाबीचा जेमी ओव्हर्टन याने सर्वाधिक १२ बळी आपल्या नावे केले. ही संपूर्ण स्पर्धा आयसीसी व यूएई क्रिकेट बोर्डाच्या संमतीने अबूधाबी येथील शेख झायद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळली गेली.
महत्वाच्या बातम्या:
दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन
BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय