कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे क्रीडाजगतात शांतता पसरली आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखली जाणारी आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
अशामध्ये आता अनेक क्रिकेटपटू आपला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवताना दिसत आहेत. त्याचबरोबर भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आता आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे.
रोहित आता सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तसेच तो आपल्या संघसहकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहे. रोहितने बुधवारी (१ एप्रिल) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबरोबर (Jasprit Bumrah) इंस्टाग्रामवरून लाईव्ह केले होते. यादरम्यान रोहितने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्याबद्दलही चर्चा केली.
झाले असे की, बुमराहबरोबर इंस्टाग्रामवर लाईव्ह (Instagram Live) करताना रोहितने मजेशीर अंदाजात चहलला खूप फटकारले. बुमराह यावेळी म्हणाला की, आता चहल टिक-टॉक स्टार झाला आहे. तर यावर रोहित म्हणाला की, तो मूर्खपणा करतो. रोहित यावेळी असेही म्हणाला की, चहल रन चित्रपटातील अभिनेता विजय राजप्रमाणे (Vijay Raj) कॉमेडी करतो.
याबरोबरच रोहित म्हणाला की, “चहल काहीतरी लाज वाटू दे. स्वत:च्या वडिलांनाही आपल्या बरोबर टिक-टॉकवर डान्स करायला सांगत आहेस.”
चहल नुकताच टिक-टॉकवरील एका व्हिडिओत आपल्या वडिलांबरोबर दिसला होता. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. तसेच चाहत्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळाली होती.
Maa ne bachpan ki shararton ka badla le he liya 🙈🙏🏻 #QurantineLife #familytime #StayAtHomeAndStaySafe 🙏🏻 pic.twitter.com/RLjsTdL4zA
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) April 1, 2020
यावेळी रोहितने खुलासा केला की, न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाच्या ग्रुप डान्सचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, ती आयडियासुद्धा चहलची होती. परंतु त्यावेळी केलेला ग्रुप डान्स हा रोहितने कोरिओग्राफ केला होता. रोहितने यावेळी हेही सांगितले की, त्या व्हिडिओमध्ये स्वॅगमुळे त्याने आपला चेहरा झाकला होता.
बुमराहबरोबर लाईव्ह चॅटदरम्यान पंतने कमेंट करत रोहितला आव्हान दिले होते. पंतने रोहितला सर्वात लांब षटकार मारण्याचे आव्हान दिले होते. यानंतर रोहित गमतीने पंतला म्हणाला की, “एक वर्षही नाही झालं तुला संघात येऊन आणि तू मला आव्हान देत आहेस.”
या दरम्यान रोहितने चाहत्यांना सांगितले की, आता तो दुखापतीतून पूर्णपणे ठीक झाला आहे. रोहितला न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले होते.
सध्या रोहित आता पूर्णपणे फीट होत आहे. यावेळी रोहित म्हणाला की, “मी एकदम फीट आहे. तसेच आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तयार होतो. परंतु तितक्यात कोरोना व्हायरसचे आगमन झाले.”
तसेच रोहित म्हणाला की, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ मजबूत आहे. तसेच जर आयपीएलचे आयोजन झाले तर खूप मजा येणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त झिरो
-धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
-गद्दार म्हणणाऱ्यांना युवराजची सणसणीत चपराक
-डकवर्थ-लुईस नियमाचा शोध लावणाऱ्या टोनी लुईसचे निधन