झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर भारतीय संघाला यूएईत खेळवला जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करायची आहे. आशिया चषकानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या मेत विश्वचषक स्पर्धेशाठी भारताचा ८० ते ९० टक्के संघ ठरला आहे. परंतु निवड समिती रोहित शर्माशी सहमत नसल्याचे दिसते.
भारतीय संघाचे वेगवान गोलंदजा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) सध्या दुखापतग्रस्त आहेत. सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हे दोघेही रिहॅब करत आहेत. तसेच विराट कोहलीच्या फलंदाजी क्रमाविषयी देखील महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारतीय संघाच्या निवड समितीतील सदस्याने याविषयी माहिती दिली.
माध्यमांतील वृत्तानुसार समितीतील एक सदस्य म्हणाला की, “निवडकर्त्यांच्या रूपात आम्हाला वाटते की, काही जागा अजूनही वादात आहेत. आम्हाला जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या दुखापतीच्या अहवालाची वाट पाहावी लागेल. दोघेही सध्या एनसीएमध्ये दुखापतीतून सावरत आहेत. जोपर्यंत विराटचा प्रश्न आहे, तर आशिया चषकात गोष्टी कशा घडतात हे पाहावे लागणार आहे.”
आयसीसीने आगामी टी-२० विश्वचषकाचा संघ घोषित करण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. त्याच दिवशी मुंबईत निवडकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडेल. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या बैठकीत उपस्थित असणे अपेक्षित आहे. आशिया चषक ११ सप्टेंबरला संपणार असल्यामुळे द्रविड आणि रोहित या बैठकीसाठी उपलब्ध राहतील, असे सांगितले जात आहे.
असा अंदाज बांधला जात आहे की, आशिया चषकासाठी निवडलेला बहुतांश संघ टी-२० विश्वचषकासाठी कायम ठेवला जाईल. गोलंदाजी आक्रमणात काही महत्वाचे बदल होऊ शकतात. तसेच राखील खेळाडूंविषयी काही निर्णय घेतली जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असल्यामुळे निवडकर्ते संघात ४ वेगवान गोलंदाजा निवडतील, असी शक्यता आहे.
तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हटलेला की, टी-२० विश्वचषकासाठी अजून अडीच महिने बाकी आहे. त्याआधी भारताला आशिया चषक, तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशातील दोन मालिका खेळायच्या आहेत. अशात ८०-९० टक्के संघ तयार आहे. परिस्थिती पाहून नक्कीच यात तीन-चार बदल होऊ शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मेहनत, सर्वांचे पाठबळ हीच यशाची गुरुकिल्ली :किरण नवगिरे
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…
‘त्याची उणीव जाणवणार नाही’, बुमराहच्या अनुपस्थितीबाबत माजी दिग्गजाचे मोठे विधान