मागच्या काही महिन्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषक 2023च्या मुद्यावरून आमने सामने आहेत. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या एका विधानानंतर हा वाद सुरू झाला, जो अद्याप मिटल्याचे दिसत नाही. आगामी आशिया चषक खेळण्यासाठी भारत पाकिस्तान दौरा करणार की नाही, याविषयी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने काही दिवासंपूर्वी प्रतिक्रिया दिली. आता अश्विनच्या या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही मत मांडले. आफ्रिदीच्या मते बीसीसीआयपुढे आयसीसी देखील काही करू शकत नाही.
बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले होते की, भारतीय संघ आघामी आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाहीये. त्यांच्या या वक्तव्यानंतर पीसीबीला धक्का बसलाच, पण तेव्हाचे पीसीबी अध्यभ रमीज राजा यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले. भारत पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील आघामी वनडे विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, असे रमीज राजा म्हणाले होते. पण भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या मते पाकिस्तानसाठी हा निर्णय सोपा नसेल. अश्विनने त्याच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर याविषयी सविस्तर व्हिडिओ शेअर केला होता. अश्विन या व्हिडिओत म्हणाला होता की, भारत जरी आशिया चषकासाठी पाकिस्तनमध्ये गेला नाही, तरी पाकिस्तानला विश्वचषकासाठी भारतात यावे लागेल. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतून माघार घेणे पाकिस्तन संघासाठी शक्य नाहीये.
अश्विनच्या या विधानानंतर क्रिकेटविश्वात वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णदार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानेही अश्विनच्या व्हिडिओवर मत व्यक्त केले. पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, “जर कोणी स्वतःच्या पायावर उभा राहण्यास असमर्थ असेल, तर कठोर निर्णय घेणे सोपे नसते. त्यांना खूप गोष्टींचा विचार करावा लागेल. भारताने स्वतःला तेवढे मजबूत बनवले आहे, ज्यामुळे ते विरोधी संघांना डोळे दाखवू शकतात. असे नसते तर असे बोलण्याची त्यांची हिम्मत नव्हती.”
“भारत आशिया चषक (Asia Cup 2023) खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येईल की नाही? याची मला काहीच कल्पना नाही. भारतात खेळल्या जाणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकातून पाकिस्तान माघार घेणार का? याची मला कल्पना नाही. पण एका पॉइंटला निर्णय घेणे गरजेचे आहे. या बाबतीत आयसीसीची भूमिका महत्वाची असेल, त्यांना पुढे यावे लागेल. मात्र, मला नाही वाटत की, बीसीसीआयपुढे आयसीसी देखील काही करू शकेल.” (“Not even ICC can do anything before BCCI…”, Shahid Afridi on Asia Cup controversy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
पहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील