फुटबॉलमधील प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या बॅलोन दी ओर या पुरस्कारासाठी फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या फॅन पोलमध्ये चाहत्यांनी लीव्हरपूलचा मोहमद सलाहला 52 टक्के मते दिली आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये लियोनल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुका मोड्रीच नाही तर सलाह आवडता झाला आहे हे दिसून येत आहे.
लीव्हरपूलकडून खेळताना सलाहने या मोसमात धडाक्यात सुरूवात केली होती. यावेळी त्याने 32 असे विक्रमी गोल करत इंग्लिश फुटबॉलचा पीएएफ प्लेयर ऑफ दी इयरचा पुरस्कार पटकावला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे.
तसेच सलाहने टोटेनहॅम हॉटस्परच्या हॅरी केनला पिछाडत 2017-18 या प्रीमियर लीगचा गोल्डन बूट जिंकला आहे. याआधी त्याने पीएएफ बरोबरच बीबीसी आफ्रिकन फुटबॉल ऑफ दी इयर, प्रीमियर लीग फ्लेयर ऑफ टी सीझन आणि लीव्हरपूलचा फॅन्स प्लेयर ऑफ दी इयर असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळवले आहेत.
मात्र लीव्हरपूलकडून खेळताना सलाहने जशी कामगिरी केली तशी त्याला रशियातील फिफा विश्वचषकात इजिप्तकडून करण्यात अपयश आले. पण त्याने मिळवलेल्या प्रसिध्दीवर चाहत्यांनी बॅलोन दी ओरसाठी घेण्यात आलेल्या पोलमध्ये त्याला 53 टक्के मते दिली. तर दुसरीकडे बार्सिलोना स्टार मेस्सीला 28 टक्के मते मिळाली. त्याने युरोपियन गोल्डन बूट मिळवला आहे तर क्लबला कोपा डेल रे जिंकण्यास मदत केली आहे.
या वर्षीचा युरो प्लेयर ऑफ दी इयर ठरलेला रियल माद्रीदचा मोड्रीचला फक्त 2 टक्के एवढीच मते मिळाली. तसेच रियलला चॅम्पियन्स लीग जिंकून देणारा रोनाल्डोलाही 5 टक्के मते मिळाली.
मेस्सी आणि रोनाल्डो यांनी विक्रमी असा पाच वेळा बॅलोन दी ओर पुरस्कार पटकावला आहे. तर या दोघांबरोबरच पॅरीस सेंट-जर्मेनचा कायलिन एमबाप्पे आणि अटलेटिको माद्रीदचा अॅंटोनी ग्रीझमन हे 2018 फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या फ्रान्समधील खेळाडूही या पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
नामांकन मिळालेले खेळाडू-
गॅरेथ बॅले (वेल्स, रियल माद्रीद)
करिम बेनझेमा (फ्रान्स, रियल माद्रीद)
इस्को (स्पेन, रियल माद्रीद)
थिबाउ कोर्टवा (बेल्जियम, रियल माद्रीद)
अॅंटोनी ग्रीझमन (फ्रान्स, अॅटलेटिको माद्रीद)
दिएगो गोडिन (उरुग्वे, अॅटलेटिको माद्रीद)
लियोनल मेस्सी (अर्जेंटिना, बार्सिलोना)
मॅर्सेलो (ब्राझिल, बार्सिलोना)
लुका मोड्रीच (क्रोएशिया, रियल माद्रीद)
सर्जियो रॅमोस (स्पेन, रियल माद्रीद)
इवान रॅटीकीच (क्रोएशिया, बार्सिलोना)
लुइस सुआरेज (उरुग्वे, बार्सिलोना)
राफेल वॅरने (फ्रान्स, रियल माद्रीद)
जॅन ओब्लॅक (स्लोवेनिया, अॅटलेटिको माद्रीद)
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार विराट कोहली पुन्हा नाराज, ही गोष्ट क्रिकेटमध्येच नको
–पुन्हा विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये या मुद्द्यावरुन वाद?
–प्रो कबड्डीत असा पराक्रम करणारा अजय ठाकूर ठरला तिसराच खेळाडू