भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यापूर्वी रिषभ पंत आणि कार्तिक यांच्यातील कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार? याविषयी चर्चा रंगल्या होत्या. अखेर पंतला बाहेर बसलून कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले, पण तो ज्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला, तो अनेकांना पटला नाही. समालोचकाची भूमिका पार पाडणाऱ्या मॅथ्यू हेडनने कार्तिकच्या संघातील भूमिकेवर महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला चार विकेट्सच्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या खेली असली तरी, गोलंदाजी विभाग मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या सामन्यात 5 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली गील होती, तर त्याच्या आधी अष्टपैलू अक्षर पेटल (Axar Patel) खेळला. अक्षर पटेलने देखील 6 धावा करून विकेट गमावली, पण अनेकांच्या मते कार्तिक जर अक्षरच्या आधी खेळला असता, तर मोठी खेळी करू शकत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यानेही संघाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.
सामना सुरू असताना समालोचन करणाऱ्या मॅथ्यू हेडनने म्हटले की, “मी दिनेश कार्तिकच्या भूमिकेविषयी विचार करत होतो. त्याला आता फलंदाजीसाठी का उतरवले गेले नाहीये. काहीही असो या गोष्टीला माझ्या दृष्टीने काहीच अर्थ नाहीये. हे पाहा मला त्याचा अपमान करायचा नाहीये. जे काही असो माझ्या दृष्टीने याला काहीच अर्थ नाही. त्याला फलंदाजीसाठी संधी दिली पाहिजे आणि सध्या त्याच्या अगदी उलटे होत आहे.” हेडन समालोचन करत असताना हे सर्व बोलत होता आणि तितक्यात अक्षर पटेलच्या चेंडूवर कॅमरून ग्रीनच्या चेंडूवर एक उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह मारला. परंतु हेडम मात्र त्याच्य मतावर ठाम होता.
तो पुढे म्हणाला की, “मला वाटते तो (कार्तिक) एवढा चांगला खेळाडू आहे की, तो देखील या परिस्थितीत असाच शॉट खेळू शकतो. मी त्याला फिनिशरच्या रूपात खेळवण्यावर प्रश्न उपस्थित करतो. माझ्या मते त्याला थोडे अजून वरती खेळवले गेले पाहिजे.” यावेळी भारताचा माजी दिग्गज अजीत आगरकर देखील समालोचन करत होता आणि त्यानेही हेडनच्या या वक्तव्याचे समर्थन केले. टी-20 मालिकेचा विचार केला, तर पहिल्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया 0-1 अशा अंतराने पुढे आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर), तर शेवटचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: ओडेन स्मिथचा प्रताप! एकाच षटकात लगावले 5 गगनचुंबी षटकार
एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस एकेरीत श्रुती अहलावत, लिली टेलर यांच्यात विजेतेपदासाठी लढत