भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात झाली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअम येथे पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले होते. त्यात मुकेश कुमार आणि तिलक वर्मा यांचा समावेश होता. मुकेशला पदार्पणात खास कामगिरी करता आली नाही, पण तिलकने आपली छाप सोडली. त्याने भारतीय संघासाठी पहिल्या टी20त सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. कौतुक करणाऱ्यांमध्ये भारतीय माजी दिग्गज खेळाडू आरपी सिंग याचाही समावेश झाला आहे.
काय म्हणाला आरपी सिंग?
आरपी सिंग (RP Singh) याने जिओ सिनेमाशी बोलताना म्हटले की, “ही खरंच खूप शानदार खेळी होती. मला वाटते की, त्याच्यामध्ये भारतीय संघाचे भविष्य लपले आहे. आपण आधीपासूनच डावखुऱ्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाचा शोध घेत आहोत. अशात तिलक वर्मा यामध्ये पूर्णपणे फिट बसू शकतो. त्याने आपल्या खेळाची सुरुवातच षटकाराने केली होती आणि पुढील चेंडूवरही षटकार मारला होता.”
आरपी सिंग पुढे म्हणाला की, “त्याचा सर्वोत्तम षटकार तो होता, जो त्याने कव्हरच्या वरून मारला होता. कोणत्याही खेळाडूसाठी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून असा षटकार मारणे सोपे नसते.” आरपी सिंगव्यतिरिक्त माजी भारतीय अष्टपैलू अभिषेक नायर (Abhishek Nayar) यानेही तिलकचे कौतुक केले.
अभिषेक म्हणाला की, “त्याच्या फलंदाजीत एक वेगळीच प्रतिमा पाहायला मिळत आहे. त्याने जो पहिला शॉट खेळला होता, तो खूपच चांगला होता. मात्र, कठीण होता. त्याच्यात खूप प्रतिभा आहे. सर्वात चांगली बाब अशी आहे की, तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. एकदा त्याने धावा करण्यास सुरुवात केली, तर तो प्रत्येक परिस्थितीत धावा करू शकतो. तो भविष्याचा खेळाडू आहे.”
तिलकच्या सर्वाधिक धावा
विशेष म्हणजे, या माजी खेळाडूंनी डावखुरा फलंदाज यशस्वी जयसवालचे नाव घेतले नाही. त्यानेही पदार्पणाच्या कसोटीत शानदार कामगिरी केली होती. दुसरीकडे विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 150 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्मा याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा चोपल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त या सामन्यात इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 30 धावांचा आकडा पार करता आला नव्हता. त्यामुळे भारताला हा सामना 4 धावांच्या फरकाने गमवावा लागला. (not yashasvi jaiswal or mukesh kumar former cricketer said this will be the future of india)
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजचा वचपा काढून मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार भारत, वाचा दुसऱ्या टी20विषयी सर्वकाही
एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट! पुढील पाच वर्षात भारतात होणार ‘दर्जा’ क्रिकेट