---Advertisement---

नॉटिंघमच्या मैदानात भारतीय संघाला भासणार हार्दिक पंड्याची कमतरता? ३ वर्षापूर्वी केला होता ‘हा’ पराक्रम

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडमधील नॉटिंघमच्या मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे हे तेच मैदान आहे जिथे भारतीय संघाने मागील इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत एकमात्र विजय मिळवला होता.

साल २०१८ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात नॉटिंघम येथे झालोल्या या कसोटी सामन्यात हार्दिक पंड्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यंदाच्या दौऱ्यात हार्दिकचा भारतीय संघात समावेश केला नाही. तसेच क्रिकेट तज्ञांच्या मते भारतीय संघाला हार्दिकची कमतरता भासू शकते. कारण याच मैदानात ३ वर्षांपूर्वी हार्दिकने भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताचा तो मालिकेतील एकमात्र विजय होता.

मागील इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला ही मालिका ४-१ अशा लाजिरवाण्या फरकाने गमवावी लागली होती. त्यातील एकमात्र विजयात हार्दिकने नॉटिंघमच्या मैदानात पहिल्या डावात ६ षटकात २८ धावा देत एकूण ५ इंग्लिश फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नंतर भारताच्या दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळीही केली होती. तर गोलंदाजी करताना दुसऱ्या डावातही त्याने बेन स्टोक्सची महत्त्वाची विकेट घेतली होती. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवता आला होता.

विशेष गोष्ट अशी की २०१८ च्याच इंग्लंड दौऱ्यात हार्दिक भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याला भारताकडून कसोटी खेळण्याची संधी मिळालेली नाही.

तसेच यंदाच्या कसोटी मालिकेतील पहिलाच सामना नॉटिंघमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यामुळे हार्दिकने या दौर्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली असती, असे अनेक दिग्गजांचे मत आहे. तसेच हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे फलंदाजीत देखील आणखी मजबुती आली असती. असे असले तरी हार्दिकला यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नाही. आता त्याची उणीव कोणता खेळाडू भरून काढणार हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या –

खेळातच नाही तर कमाईतही एक नंबर आहे पीव्ही सिंधू

संघाला पहिला वनडे विजय ज्यादिवशी मिळवून दिला, त्याच्या बरोबर ३ वर्षांनी कर्णधाराने घेतली निवृत्ती

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ दोन दिग्गजांना मिळू शकतो डच्चू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---