---Advertisement---

ऐतिहासिक विजेतेपदानंतर ढसाढसा रडला जोकोविच; पाहा भावूक करणारा व्हिडिओ

On: रविवार, जानेवारी 29, 2023 7:09 PM
---Advertisement---

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने रविवारी (29 जानेवारी) ऑस्ट्रेलिया ऑपन 2023 चे विजेतेपद पटकावले. जोकोविचने ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास याला मात दिली.  जोकोविचने हा सामना 6-3, 7-4, 7-6 अशा फरकाने जिंकला. या विजयानंतर जोकोविच अक्षरशः ढसाढसा रडताना दिसला. ‌‌

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या जोकोविचने या सामन्यात वर्चस्व गाजवले. पहिला सेट सहजतेने जिकल्यानंतर दुसऱ्या दोन सेटमध्ये त्सित्सिपास याने त्याला संघर्ष करायला लावला. मात्र, आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने विजय खेचून आणला. हे त्याचे दहावे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद ठरले. तसेच त्याने यासोबत स्पेनच्या राफेल नदाल याच्या 22 ग्रँडस्लॅम  विजेतेपदांची बरोबरी केली. जोकोविच याच्यासाठी हे विजेतेपद काहीसे खास होते.

 

मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना व्हायरल सर्वत्र थैमान घालत असताना ऑस्ट्रेलिया ओपनसाठी कोरोनाप्रतिबंधक लस घेणे बंधनकारक केले गेलेले. मात्र, जोकोविचने मात्र ही लस शेवटपर्यंत घेतली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ओपनसारख्या मोठ्या टेनिस स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली.

त्यानंतर आता बरोबर एका वर्षाने त्याने त्याच मैदानावर पुनरागमन करत विजेतेपद आपल्या नावे केले. तसेच, या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आपले कुटुंबीय समोर असताना त्याला अश्रू अनावर झाले. विजेतेपदानंतर तो रडताना दिसला. या सामन्यानंतर बोलताना त्याने आपल्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले. त्याने या विजयानंतर आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.

(Novak Djokovic breaks down after won Australian open)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---