---Advertisement---

विराटने नोव्हाक जोकोविचची केली स्तुती, आता दिग्गज टेनिसपटूने दिले असे उत्तर

On: सोमवार, जानेवारी 15, 2024 11:33 AM
Novak Djokovic Virat Kohli
---Advertisement---

वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या अगदी आधी टेनिस दिग्गज नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथसोबत क्रिकेट खेळला. दोघेही टेनिस कोर्टवर एकमेकांसमोर आले होते. यानंतर जोकोविचकडून क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. येथे त्याने विराट कोहली याचे नावही घेतले. यानंतर विराटला जोकोविचबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने या टेनिसपटूशी असलेल्या त्याच्या संबंधाविषयी सविस्तरपणे सांगितले. यादरम्यान कोहलीने जोकोविचचे खूप कौतुकही केले होते. कोहलीच्या या स्तुतीनंतर जोकोविचने आता विराटचे आभार मानले आहेत.

जोकोविचने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्याने भारतीय क्रिकेट संघाचा एक रील शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली त्याचे कौतुक करताना दिसत आहे. ही रील शेअर करताना जोकोविचने लिहिले आहे की, “या सुंदर शब्दांसाठी विराटचे आभार. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा आम्ही एकत्र खेळू.” (novak djokovic shares instgram story for virat kohli)

शनिवारी (13 जानेवारी) इंदूरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 सामन्याच्या एक दिवस आधी, विराट कोहलीने बीसीसीआय टीव्हीशी संवाद साधताना नोव्हाक जोकोविचसोबतच्या मैत्रीशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. विराट कोहली म्हणाला होता, “मी इंस्टाग्रामवर नोवाकची प्रोफाइल पाहत होतो. त्याला मेसेज करण्यासाठी मी चॅट बॉक्स उघडला आणि त्याने मला आधीच मेसेज केल्याचे दिसले. मी पहिल्यांदा माझा मेसेज बॉक्स उघडला. त्याचा मेसेज खूप आधी आला होता. सुरुवातीला मला वाटले की, तो एखाद्या बनावट आयडीवरून आला असावा, पण मी पुन्हा तपासले तेव्हा मला कळाले की, हा मेसेज खऱ्या आयडीवरून आला आहे. यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. यशाबद्दल आम्ही एकमेकांचे अभिनंदन केले.”

यानंतर विराटने नोव्हाकचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, “मी त्याचा खूप आदर करतो. त्याची टेनिस कारकीर्द चमकदार आहे. त्याचा फिटनेस मला नेहमीच प्रेरणा देतो. कोहलीने असेही सांगितले की, मला जोकोविचसोबत भारतात कॉफीवर बोलायचे आहे.” शेवटी त्याने जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनसाठी शुभेच्छाही दिल्या. (Virat praised Novak Djokovic, now the tennis legend has given his reply)

हेही वाचा

‘तू एक मजबूत, शक्तिशाली महिला आहेस’, चहलने पत्नी धनश्रीचे कौतुक करत शेअर केला खास फोटो
‘हे तोपर्यंत संपणार नाही’, शिखर धवनने नवा लूक आणि खास कॅप्शनसह शेअर केला खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---