नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची रविवारी (29 जानेवारी) सांगता झाली. स्पर्धेतील अखेरचा सामना पुरुष एकेरीचा पार पडला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास याचा 6-3, 7-4, 7-6 असा पराभव केला. जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वे ग्रँडस्लॅम ठरले.
KING OF MELBOURNE 👑 @DjokerNole pic.twitter.com/myM619PTVN
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
तब्बल दहाव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असलेल्या जोकोविच याला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. हा सामना जिंकून त्याला स्पेनच्या राफेल नदाल याच्या सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅमची बरोबरी करण्याची संधी होती. त्याने सुरुवातीपासूनच आपण विजयासाठीच खेळत असल्याचे दाखवून दिले.
अनुभवाने काहीशा कमी असलेल्या त्सित्सिपास याच्यावर पहिल्याच सेटमध्ये त्याने 6-3 अशी मात केली. मात्र, त्सित्सिपास याने दुसऱ्या सेटमध्ये भक्कम पुनरागमन केले. टाय ब्रेकरपर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 7-4 अशी मुसंडी मारली. दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा त्सित्सिपास याने संघर्ष केला. या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी असताना, जोकोविचने पुन्हा एकदा आपला अनुभव दाखवून दिला. टाय ब्रेकरमध्ये जोकोविचने आक्रमक खेळ करताना हा सेट 7-6 असा आपल्या नावे करत विजय मिळवला.
जोकोविचचचे हे 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. यासह त्याने राफेल नदाल याच्या विक्रमी 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली. दुसरीकडे, त्सित्सिपास याला आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
(Novak Djokovic Won Novak Djokovic Won Australian Open 2023 His 22 Th Grandslam All Over Open 2023 His 22 Th Grandslam All Over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो