भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे. रायुडूने बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. आपल्या जागी विजय शंकरला संधी दिल्याने आपण नाराज झाल्याचे त्याने म्हटलेले. त्याच्या या प्रतिक्रियांवर आता तत्कालीन निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी उत्तर दिले आहे.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासा केला. त्याने म्हटले की, “2018मध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मला 2019 विश्वचषकासाठी तयार राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, अचानक माझ्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दुसऱ्या फलंदाजाला नाही, तर एका अष्टपैलू विजय शंकरला निवडले होते. जर 2019 विश्वचषकात निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी आणि वरिष्ट खेळाडूला माझ्या जागी घेतले असते, तर समजले असते.”
यासह त्याने प्रसाद यांच्यावर पक्षपाताचा आरोप हे केलेला. आता याबाबत बोलताना प्रसाद म्हणाले,
“आपल्या सर्वांना माहित आहे की निवड समितीत पाच लोक असतात. असा निर्णय कोणीही एक व्यक्ती घेत नाही. हा एक सामूहिक निर्णय होता. एक व्यक्ती मनमानी कारभार करत असेल तर पाच जणांच्या समितीचा फायदा काय?”
भारतीय संघात संधी न मिळाल्याने रायुडू याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केलेली. मात्र, काही दिवसांनंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. परंतु, त्यानंतरही त्याला भारतीय संघात जागा मिळाली नव्हती. नुकत्याच झालेल्या आयपीएलनंतर त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून, आता तो अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट खेळताना दिसेल.
(Now MSK Prasad Reply Ambati Rayudu On His 2019 ODI World Cup Statement)
महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप