वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटने पुढील हंगामासाठी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स फ्रँचायझीशी करार केला आहे. 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडू स्पर्धेअगोदर ऑस्ट्रेलियात पोहोचेल. टॉम करन आणि जेम्स व्हिन्स यांच्या व्यतिरिक्त सिक्सर्सचा तिसरा परदेशी खेळाडू म्हणून तो संघात सामील होईल.
सिडनी सिक्सर्सच्या वेबसाईटवर ब्रेथवेटने सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जालमीकडून खेळताना त्याने दिलेली प्रतिक्रिया सांगितली आहे. तो म्हणाला, “सिडनीबरोबर माझ्या काही चांगल्या आठवणी आहेत. मला वाटते सिडनी सहजच माझे आवडते शहर बनले आहे. मी एससीजीमध्ये माझा दुसरा कसोटी सामना खेळला, ज्याच्या माझ्या काही चांगल्या आठवणी आहेत आणि मला बीबीएलमध्ये सिक्सर्सकडून खेळण्याच्याही आठवणी आहेत. हा एक चांगली संघ आहे.”
संघाचे प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड म्हणाले, “बीबीएल -10 मध्ये ब्रेथवेटसह पुन्हा एकत्र येण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. तीन हंगामांपूर्वी आम्ही झगडत होतो. पण ब्रेथवेटने बदली म्हणून संघात येऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि आम्ही चार पैकी चार सामने जिंकण्यात यश मिळविले. ब्रेथवेट असा खेळाडू आहे जो मैदानाच्या आत व बाहेर सातत्याने चांगले काम करतो. त्यामुळे आम्ही त्याला पुन्हा सामील करण्यासाठी उत्सुक आहोत.”
गतविजेता सिक्सर्स 10 डिसेंबरपासून होबार्ट हरिकेन्सविरुध्द त्यांचा पहिला सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर