---Advertisement---

अरेरे! भारताने सामना गमावताच ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया, नेटकरी म्हणाले, ‘हा भारत विराट आणि बुमराहशिवाय…’

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 6:19 PM
Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुक्रवारी (दि. 25 नोव्हेंबर) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने भारताचा पराभव केला. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांनी 221 धावांची भागीदारी रचत सामना 2.5 षटकात संपवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 307 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान यजमानांनी सहजरीत्या पार केले. अशात भारताच्या दारुण पराभवानंतर नेटकऱ्यांच्या ट्विटर प्रतिक्रिया येत आहेत.

न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना टॉम लॅथम (Tom Latham) याने 104 चेंडूंचा सामना करताना नाबाद 145 धावा कुटल्या. यामध्ये 5 षटकार आणि 19 चौकारांचा समावेश होता. तसेच, कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाबाद 94 धावा चोपल्या. या दोघांच्या 221 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने भारताने दिलेल्या 307 धावांचे आव्हान 309 धावा करून पार केले.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना उमरान मलिक (Umran Malik) याने 10 षटकात 66 धावा खर्च करत दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, शार्दुल ठाकूर यानेही 9 षटकात 63 धावा देत 1 विकेट घेतली.

शिखर धवनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित
भारताच्या वरच्या फळीने चांगली कामगिरी केली. भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 76 चेंडूत 80 धावा चोपल्या. यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 72 आणि शुबमन गिल (Shubman Gill) याने 50 धावांचे योगदान दिले. तसेच, खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 37), संजू सॅमसन (36), रिषभ पंत (15) यांनी संघाच्या धावसंख्येत योगदान दिले.

फलंदाजीत भारताचे काही फलंदाज अपयशी ठरले. मात्र, काहींनी चांगले योगदान दिले. असे असले, तरीही न्यूझीलंडला आव्हान पार करताना रोखण्यात भारत अपयशी ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर भारताच्या खराब प्रदर्शनची चर्चा रंगली आहे. ट्विटरवर संघाच्या गोलंदाजीवर निशाणा साधला जात आहे, तर शिखर धवनच्या खराब नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासोबतच पंतच्या खराब फॉर्म आणि सूर्यकुमारच्या वनडे प्रदर्शनावर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत.

चला तर पाहूयात भारताच्या खराब गोलंदाजीवरील ट्विटर प्रतिक्रिया
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “300 हून अधिक धावा केल्यानंतरही आपली गोलंदाजी कधीच खतरनाक वाटत नाही. हाच भारतीय संघ आहे तुमच्यासाठी.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “बीसीसीआय, निवडकर्ते आणि सर्व प्रशिक्षकांना भारताच्या गोलंदाजीवर काम केले पाहिजे. टॉप संघांमध्ये आपली गोलंदाजी लाईन सर्वात खराब आहे.”

आणखी एकाने लिहिले की, “हा भारतीय संघ विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहशिवाय काहीच नाहीये. भारतीय संघाकडून सामान्य गोलंदाजी.”

सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाबद्दल एकाने लिहिले की, “जेव्हाही मला वाटेल भारतीय संघ जिंकू शकतो, तेव्हा भारतीय संघाला नेहमीच सहाव्या गोलंदाजी पर्यायाची गरज आहे.”

धवनच्या नेतृत्वाबद्दल एक जण म्हणाला की, “शिखर धवन भारतीय इतिहासातील सर्वात खराब कर्णधारांपैकी एक आहे.”

आणखी एकाने असे लिहिले की, “शिखर धवनला कर्णधार बनवणे सर्वात खराब निर्णय आहे. तो सामना गांभीर्याने घेत नाही.”

https://twitter.com/VikasMic/status/1596065281147023360

“शिखर धवन एक चांगला कर्णधार नाहीये. कारण, त्याला गोलंदाजांमध्ये बदल करता येत नाही,” असेही एकाने लिहिले.

न्यूझीलंड आणि भारत संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. (nz vs ind 2022 twitter reaction on team india worst bowling shikhar dhawan poor captaincy see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नक्की पूर्णवेळ कर्णधार कोण? वर्षभरात रोहितपेक्षा जास्तवेळा शिखरच्या नेतृत्वात खेळलीये टीम इंडिया
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---