---Advertisement---

भारतासाठी वॉशिंग्टनची सुंदर कामगिरी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केला ‘हा’ पराक्रम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 4:46 PM
Washington Sundar
---Advertisement---

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळवली गेलेली टी20 मालिका भारताने आपल्या खिशात घातली. त्यानंतर शुक्रवारी (दि. 25 नोव्हेंबर) या संघादरम्यान एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी ऑकलंड येेथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडने 7 गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या वॉशिंग्टन सुंदर याने फलंदाजीत भारताच्या अनेक दिग्गजांना मागे पाडले. भारतासाठी जलद गतीने 30 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुंदरने सेहवाग आणि युवराज यांनाही मागे सोडले.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकात 306 धावा केल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने 16 चेंडूत 37 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. या धावा त्याने 231.25च्या स्ट्राईक रेटने बनवल्या. या खेळीच्या बळावर त्याने भारताच्या अनेक दिग्गज फंलदाजांना मागे सोडले. वेगवान 30 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांसारख्या फंलदाजांना मागे पाडले.

भारताबाहेर सर्वात जास्त स्ट्राईक रेटने धावा करणारे भारतीय (कमीत कमी 25)
231.25 – वॉशिंग्टन सुंदर, विरुद्ध /न्यूझीलंड, 25 नोव्हेंबर 2022
225 – विनय कुमार, विरुद्ध झिम्बाब्वे, 2013
218.18 – विरेंद्र सेहवाग, विरुद्ध श्रीलंका 2005,
215.62 – सुरेश रैना, विरुद्ध बांगलादेश, 2009
211.11- सुरेश रैना, विरुद्ध न्यूझीलंड, 2009

न्यूझीलंडमध्येे भारताकडून वेगवान 30 धावा करणारे खेळाडू
वॉशिंग्टन सुंदर- 231.25 स्ट्राईक रेट
सुरेश रैना – 211.11 स्ट्राईक रेट
कपिल देव – 206.25 स्ट्राईक रेट

भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकांमध्ये 306 धावा केल्या. भारतासाठी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 80 धावा करत भारताच्या फलंदाजीचा धुरा सांभाळली. तसेच कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 72 धावा केल्या तर आपला पहिलाच एकदिवसीय सामना खेळणाऱ्या शुबमन गिल (Subman Gill) याने 50 धावांचे योगदान दिले.(Washinton Sundar has made history to score fastest 30 runs in ODI for India)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं
वनडेत धवन-गिल जोडी सुपरहिट! आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल चक्कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---